नवऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन ती जायची हॉटेलमध्ये,पतीला तिचा संशय आला अन …

नागपूरः एका व्यापाऱ्याला त्याची पत्नी रात्री झोपेच्या गोळ्या द्यायची आणि घरातून निघून जायची. रात्री हॉटेलमध्ये परपुरुषासोबत रात्र घालवायची. मागच्या काही दिवसांपासून हा प्रकार चालूच होता.
मुलीची प्रकृती खराब झाल्याने पत्नीचं हे कांड उघडलं पडलं. नवऱ्याने जीपीएसद्वारे पत्नीचा शोध घेतला आणि तिला रंगेहात पकडलं. नागपूरमध्ये ही घटना घडली आहे.
नागपूर शहरातल्या वर्धा रस्त्यावर असेलल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये हा प्रकार उघड झाला. घटनेतील महिला एका व्यापाऱ्याची पत्नी आहे. ही महिला मेजवाण्यांच्या बहाण्यांना रात्र-रात्र घराबाहेर रहायला लागली. त्यामुळे पतीला तिचा संशय आला आणि तिचा माग काढण्याचं ठरवलं. त्यासाठी व्यापारी असलेल्या पतीने पत्नीच्या गाडीत जीपीएस बसवले.
जसा पतीला संशय आला तसाच संशय पत्नीलाही आला. तिने नवऱ्याला जेवणातून झोपेच्या गोळ्या द्यायला सुरुवात केली. नवरा झोपी गेला ती रात्री बाहेर पडायची आणि हॉटेलमध्येच रात्र घालवायची. इकडे नवरा मात्र झोपलेला असायचा. मात्र काहीच दिवसांआधी तिची मुलगी रात्री झोपेतून उठली. तिचं पोट दुखू लागल्याने ती आईला शोधू लागली. परंतु आई नसल्याने तिने वडिलांना जागवण्याचा प्रयत्न केला.
व्यापारी एवढे गाढ झोपले होते की मुलीच्या उठवण्याने ते उठले नाहीत. शेवटी मुलीने तिच्या काकांना फोन केला. ते लगबगीने भावाच्या घरी पोहोचले. त्यांनी त्यांच्या भावाला जागं केलं. तेव्हा त्यांना या गाढ झोपेबाबत संशय आला. त्यानी तातडीने जीपीएसवरुन पत्नीचं लोकेशन काढलं आणि ते हॉटेल गाठलं. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी गोपनियतेचं कारण देऊन प्रवेश नाकारला. मात्र व्यापारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी काहीतरी कारण सांगून खोलीत प्रवेश मिळवला.
हॉटेलमध्ये व्यापाऱ्याला त्याची पत्नी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. हॉटेलमध्ये चांगलाच गदारोळ सुरु झाला. व्यापाऱ्याने पोलिसांमध्ये धाव घेऊन पत्नीची तक्रार घेतली, मात्र मुलीमुळे ती तक्रार मागे घेतली. व्यापारी पतीने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली. या सगळ्या प्रकाराची नागपूरमध्ये लोक चर्चा करीत आहेत.