Video : महाकुंभमेळ्यात भीषण आग! एकामागून एक सिलिंडरचे ब्लास्ट

महाकुंभात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. तंबूत ठेवलेले सिलिंडर सतत ब्लास्ट होत आहेत. या आगीत 20 ते 25 तंबू जळाले आहेत. आखाड्यासमोरील रस्त्यावरील लोखंडी पुलाखाली ही आग लागली.
अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज महाकुंभच्या सेक्टर 19 नगरमध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. महाकुंभात अनेक तंबूंना आग लागली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आगीमुळे मंडपात ठेवलेले सामान जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीमुळे काळ्या धुराचे लोट संपूर्ण जत्रा परिसरात दिसत होते. ही घटना तुलसी मार्ग सेक्टर १९ येथील असल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी लोकांना बाहेर काढत आहेत. आग पसरू नये म्हणून जवळपासच्या तंबूत राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. डझनभर झोपड्या जळून खाक झाल्याचं बोललं जात आहे. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गीता प्रेस गोरखपूरच्या शिबिरावरही परिणाम झाला आहे. आगीवर अद्याप नियंत्रण मिळालेले नाही. आग अजूनही सतत धुमसत आहे. घटनास्थळी डझनहून अधिक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही. सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.