Video : बघून तुम्हालाही धक्का बसेल,फॅक्टरीमध्ये ज्यूस बनवतानाचा व्हिडीओ

आजकालच्या बिझी लाइफस्टाईलमुळे लोक खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे पाहिलं तसं लक्ष देत नाहीत. आधी लोक घरच्या जेवणाला अधिक प्राधान्य देत होते, पण आजकाल लोक बाहेरचं जास्त खाऊ लागले आहेत.
पॅकेटमधील अनेक पदार्थ लोक रोज खातात. पॅकेटमध्ये बंद पदार्थ अनहेल्दी असल्याचं नेहमीच सांगितलं जातं, पण लोक काही खाणं सोडत नाहीत.
जगभरातील अनेक पॅकेट किंवा बॉटलमध्ये ज्यूस विकणाऱ्या कंपन्या आपल्या जाहिरातींमध्ये हे ज्यूस कसे हेल्दी असतात याबाबत सांगतात. फ्रेश ज्यूस तयार करण्यात जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून लोक हे पॅकेटमधील ज्यूसचं पितात. या ज्यूसमध्ये असे अनेक प्रिजर्वेटिव्स असतात, जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. अशात एका मोठ्या ज्यूस फॅक्टरीचा व्हिडीओल व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हालाही धक्का बसेल.
सोशल मीडियावर एका मल्टीनॅशनल कंपनीच्या फॅक्टरीत ज्यूस बनवतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इथे बेरीजचा ज्यूस बनवला जात आहे. अचानक लोकांची नजर सापावर पडते. फॅक्टरीचा कर्मचारी मोठ्या मुश्किलनं या सापाला मशीनच्या क्रशरमध्ये जाण्यापासून रोखतो. जर असं केलं नसतं की, सापही त्यात चिरडला गेला असता आणि ज्यूसमध्ये मिक्स झाला असता.
हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. असेही काही यूजर्स समोर आलेत, ज्यांनी स्वत: अशा ज्यूस फॅक्टरीमध्ये काम केलं आहे. एका व्यक्तीनं लिहिलं की, ‘अनेकदा फळांसोबत उंदीर किंवा छोटे-मोठे जीव या मशीनमध्ये चिरडले जातात. त्यांना वेगळं काढलं जात नाही. फक्त पुढील प्रक्रियेत त्यांची टेस्ट दाबली जाते. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की, ‘कदाचित ज्यूस कंपन्यांच्या डब्यांवर इतर फ्लेवरचा अर्थ हाच होत असेल’.