ताज्या बातम्या

तरुण 3000 नंतरचं जग पाहून आला, भविष्यातील जगाबाबतचे खतरनाक दावे; पुरावेही दिले


प्रत्येकाला आपलं भविष्य जाणून घेण्याची ओढ असते. त्यासाठी लोक ज्योतिषाकडे जातात. भविष्यात काय वाढून ठेवलं याची माहिती घेतात. करिअर, कौटुंबिक गोष्टी आणि आपलं आयुष्यमान किती असेल याची माहिती घेण्यात लोकांना उत्सुकता असते.

नवीन वर्ष कसं जाईल? आर्थिक लाभ होईल की नुकसान होईल याची माहितीही लोक घेत असतात. एखादं संकट येणार असेल तर ते संकट टाळण्यासाठी काय उपाय करता येईल याचीही चर्चा करतात. आपल्याला ज्योतिषी माहीत आहेत. ते भविष्यातील गोष्टी सांगतात हे माहीत आहे. पण काही लोक स्वत:ला टाइम ट्रव्हलर मानतात. आपण भविष्यात जाऊन आल्याचा दावा ते करतात. भविष्यातील दुनिया कशी असेल? भविष्यात काय संकटे येतील याची माहितीही देतात. त्यासाठीचे पुरावेही देतात.

 

एका व्यक्तीने असाच एक दावा केला आहे. 3000 नंतरचं जग पाहून आल्याचा दावा त्याने केला आहे. 3000 सालानंतर जग कसं असेल याची माहिती देतानाच त्याने काही पुरावेही दिले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लोक पुढच्या दिवसात काय होईल हे सांगू शकत नाही. मात्र हा व्यक्ती 3000 वर्षानंतरच्या दुनियेत जाऊन आल्याने सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.

 

विदेशातील मिरर या वृत्तसंस्थने हे वृत्त दिलं आहे. एडवर्ड नावाच्या व्यक्तीने आपण टाईम ट्रॅव्हलर असल्याचा दावा केला आहे. त्याच्या दाव्यानुसार तो 3000 वर्षानंतरचं जग पाहून आला आहे. सध्या 2025 सुरू आहे. पण 5000 मध्ये जग कसं असेल हे आपण पाहून आल्याचा त्याचा दावा आहे. त्याच्याकडे पुरावा म्हणून एक फोटोही आहे. तो हातात फोटो घेऊन दिसत आहे. त्या फोटोत एक संपूर्ण शहर पाण्यात डुबलेलं दिसत आहे. हे शहर म्हणजे अमेरिकेचं लॉस एंजिल्स आहे. 3000 वर्षानंतर हे शहर पाण्यात बुडून जाणार असल्याचा दावा केला जात आहे. काही आणखी शहरही अशीच दिसणार आहेत. काही वर्षापूर्वी आणखी एका टाइम ट्रॅव्हलरने यापेक्षाही भयानक फोटो दाखवला होता. संपूर्ण जग खत्म झालं आहे आणि मीच तिथे एकटा आहे, असा दावा त्याने केला होता.

 

शहरांची अशी होईल अवस्था

एडवर्डने त्याची खरी ओळख सांगितलेली नाही. त्याने आपला चेहराही धुरकटच दाखवला आहे. त्याला आपली ओळख सार्वजनिक करायची नाहीये. 2024मधील एका गुप्त मोहिमेवर मी होतो. मला जेव्हा या कामाला लावलं तेव्हा मी एका प्रयोगशाळेत काम करत होतो. येताना पुरावा असावा म्हणून आपण या गोष्टी सोबत आणल्याचा दावा त्याने केला आहे. एडवर्डने जो फोटो दाखवला आहे, तो फोटो आर्मोनियाच्या एका पार्कमध्ये शुट केल्याचं दिसतंय. मी एका उंच लाकडाच्या मंचावर उभा होतो. सर्व घर आणि इणारती लाकडांनी बनलेल्या होत्या. पण संपूर्ण शहर पाण्यात होतं. हेच शहर नाही तर जगातील असंख्य शहरं अशा प्रकारे पाण्यात बुडून जाणार आहेत. ग्लोबल वार्मिंगमुळे बर्फ वितळू लागला तर माणसाला पाण्यात राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा दावाही त्याने केला.

 

नोआने सुद्धा केली होती भविष्यवाणी

यापूर्वी नोआ नावाच्या एका व्यक्तीने ही अशीच आश्चर्यकारक भविष्यवाणी केली होती. त्यानेही तो 2030मध्ये जाऊन आल्याचा दावा केला होता. 2030मध्ये पृथ्वीवर अनेक बदल झाल्याचं दिसून आल्याचा त्याने दावा केला आहे. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअरची एकमेव नात योलान्डा रेनी किंग 2030मध्ये अमेरिकेची राष्ट्रपती होईल असं त्याने म्हटलंय. कायद्यानुसार ती राष्ट्रपती होणार नाही. कारण 2030मध्ये ती 21 वर्षाची असेल. अमेरिकन कायद्यानुसार राष्ट्रपतीपदासाठी 35 वय असायला हवं. मात्र, त्यावर नोआने नवा दावा केला आहे. अमेरिकेत नवा कायदा पारित होईल. कोणत्याही वयाचा व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्रपती बनण्याचा हा कायदा असेल. त्यामुळे योलान्डाचा मार्ग मोकळा होणार असल्याचं त्याने म्हटलं आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button