36 वर्षाच्या विवाहितेचा 15 वर्षाच्या मुलावर जीव जडला, दोघे पळून गेले, पण नंतर जे घडलं ते भयानक!
देशात गेल्या काही वर्षापासून एक्स्ट्रा मॅरिटेअल अफेअरच्या घटना वाढल्या आहे. पोलीस ठाण्यात दर एका गुन्ह्यामागे एक अशी घटना असते. त्यामुळे या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
अशात आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक 36 वर्षीय विवाहित महिला एका 15 वर्षाच्या तरूणासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या काही महिन्यानंतर दोघेही परत आले.पण नंतर जे दोघांसोबत घडलं ते खूप भयावह होतं.
या घटनेतील महिला ही विवाहित होती. तिच्यासोबत तिचा पती, मुलगा आणि मुलगी अशा तिघांसोबत ती सिडको परिसरात राहायची. या दरम्यान तिच्या परिचयाचा एक 15 वर्षीय मुलगा तिथेच जवळ राहायचा. या मुलासोबत तिचे नेहमी बोलणे चालणे असायचे. या दरम्यान विवाहित महिलेचे मुलासोबत प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधातून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच दोघेही पळून गेले.
पळून जाताना दोघांकडे थोडे थोडकेच पैसे होते. त्यामुळे दोघांचे काही दिवस चांगलेच मजेत गेले. पण नंतर पैसै संपल्यावर दोघांना एका मुंबईच्या बांधकाम साईटवर राहिले. त्यानंतर पुढचे दिवस आणखीणच कठीण जाण्याच्या भितीने दोघांनी पुन्हा माघारी जाण्याचा निर्णय़ घेतला आणि दोघे कायद्याच्या कचाट्यात सापडले.
दरम्यान दोघांच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दिल्या होत्या. त्यानुसार घरी परतल्यानंतर महिलेच्या नवऱ्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सूरू केला. यावेळी दोघांनीही मर्जीने पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. पण मुलगा हा अज्ञान असल्यामे महिलेवर त्याच्या अपहरणाचा प्राथमिक गुन्हा दाखल केला. त्यामुळे महिलेच्या अडचणी वाढल्या आहेत. या घटनेची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.