चष्मा कायमचा घालवण्यासाठी 20 रुपयांत मिळणाऱ्या या पदार्थांचा करा आहारात समावेश, रातोरात दृष्टी होईल तीक्ष्ण
डोळे हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतात. यांच्या मदतीने आपण संपूर्ण जग पाहू शकतो. बदलत्या काळाबरोबर आरोग्याच्या समस्याही फार वाढल्या आहेत. यातच डोळ्यांचे आजारही फार वाढू लागले आहेत.
पूर्वी वय वाढले की लोकांना चष्मा लागायचा मात्र आजकाल कमी वयातच लोकांची दृष्टी कमी होत चालली आहे. आता लोकांना कमी वयातच चष्म्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. सतत स्क्रीनसमोर काम करणे, प्रदूषण, तसेच ताणतणाव यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य खराब होत असते मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, काही पदार्थांच्या सेवनाने तुम्ही या समस्येला दूर करू शकता. या फळांच्या सेवनाने तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
या फळांचा करा आहारात समावेश
किवी (Kiwi)
किवी (Kiwi) हे फळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. हे फळ व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे डोळ्यांच्या पेशींना नुकसान होण्यापासून संरक्षण देते. सतत स्क्रीनसमोर राहणाऱ्यांसाठी किवी या फळाचे सेवन फायदेकारक ठरू शकते. हे डोळ्यांच्या तणावावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. किवी या फळात लुटेन (Lutein आणि झिझँथिन (zeaxanthin) नावाचे घटक आढळतात, जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे घटक मॅक्युलर डिजनरेशन आणि कॅटरॅक्टसारख्या डोळ्यांच्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. तसेच, हे घटक डोळ्यांवर येणाऱ्या हानिकारक प्रकाशाच्या किरणांपासून बचाव करतात.
गाजर (Carrot)
गजरात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांच्या रेटिनाला मजबूत करते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते. त्यामुळे सलाद इत्यादीद्वारे गाजराचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा. सध्या हिवाळा सुरु आहे, या ऋतूत बाजारात भरपूर प्रमाणात गरज विक्रीसाठी येत असतात.
पालक (Spinach)
पालक ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारख्या अँटिऑक्सिडंटने समृद्ध आहे. पालक डोळ्याच्या पेशींना नुकसान होण्यापासून संरक्षण करून दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच पालक शरीराच्या इतर भागांसाठीही खूप फायदेशीर ठरते, ज्यामुळे याचा आवर्जून आहारात समावेश करायला हवा.
केळी (Banana)
केळी पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए समृद्ध आहे. केळी डोळ्यांना हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि दृष्टी सुधारते. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि डोळे कोरडे पडण्याची समस्या कमी होते.