‘श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही! फक्त ‘या’ गोष्टींवर खर्च करा’, आचार्य चाणक्यांचा मूलमंत्र

Chanakya Niti : आजकाल आपण पाहतो.. श्रीमंत होण्यासाठी अनेकजण खूप मेहनत करतात. विविध उपाय करतात, पण त्यांच्या मेहनतीला यश मिळतेच असे नाही. जर एखाद्या व्यक्तीने पैशाचा योग्य वापर केला तर तो केवळ श्रीमंतच होत नाही, तर त्याचे जीवन आनंदी आणि यशस्वी देखील बनवू शकतो.
असं आम्ही नाही आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीतीमध्ये सांगितलंय..आचार्य चाणक्य हे भारतातील महान विचारवंत आणि राजकारण्यांपैकी एक होते. त्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त असेही म्हणतात. त्यांची धोरणे आणि तत्त्वे आजही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक आहेत. पैशाचा योग्य वापर आणि जीवन यशस्वी करण्यासाठी चाणक्यांनी आपल्या धोरणांमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांच्या मते, श्रीमंत होण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या गोष्टींवर आपण सर्वात जास्त पैसा खर्च केला पाहिजे. जाणून घेऊया त्या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत?
‘ही’ माणसाची सर्वात मोठी संपत्ती
आचार्य चाणक्य मानत होते की, शिक्षण आणि ज्ञान ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांनी म्हटलंय की, “विद्या धनम् सर्व धनम् प्रधानम्” म्हणजेच ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. जर एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर त्याने प्रथम आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शिक्षण आणि ज्ञानाच्या साहाय्याने एखादी व्यक्ती केवळ योग्य आणि चुकीचा फरकच करू शकत नाही, तर आपल्या जीवनात योग्य निर्णय देखील घेते. चाणक्य म्हणाले की, सुशिक्षित व्यक्तीचा समाजात आदर केला जातो आणि त्याला संधींची कमतरता नसते. शिक्षणावर खर्च करण्यास आपण कधीही कमी पडू नये. मग ते औपचारिक शिक्षण असो किंवा विशिष्ट कौशल्य शिकण्याची संधी असो. ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी गुंतवणूक करावी…
आपले शरीर निरोगी नसेल तर…
चाणक्याने म्हटलंय की “शरीरमाद्यम् खलु धर्मसाधनम्” म्हणजेच शरीर हे एक माध्यम आहे, ज्याद्वारे आपण आपली सर्व कर्तव्ये पार पाडू शकतो. जर आपले शरीर निरोगी नसेल तर आपण जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. आरोग्य ही जीवनाची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि श्रीमंत होण्याच्या दिशेने सर्वात महत्वाची पायरी आहे. चाणक्याने आरोग्यावर खर्च करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. उत्तम आरोग्यासाठी, योग्य खाण्याच्या सवयी, व्यायाम, योगासने आणि ध्यान यांमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी आणि वेळेवर उपचार करणेही आवश्यक आहे. जर तुम्ही निरोगी असाल, तर तुम्हाला दीर्घायुष्य तर लाभेलच पण तुमच्या कामात उत्कृष्टताही मिळवता येईल.
योग्य लोक आणि नातेसंबंधांवर खर्च करा
चाणक्यांच्या मते, व्यक्तीने आपल्या संपत्तीचा काही भाग चांगले लोक आणि नातेसंबंध टिकवण्यासाठी खर्च केला पाहिजे. त्यांनी म्हटले आहे की, “सोबतीचा माणसाच्या जीवनावर प्रभाव असतो.” श्रीमंत होण्यासाठी योग्य संगती असणे खूप गरजेचे आहे. चाणक्य यांनी जीवनात चांगले मित्र आणि कुटुंबाचे महत्त्व स्पष्ट केले. जर तुमच्या आजूबाजूला चांगले आणि सकारात्मक लोक असतील तर ते तुम्हाला मानसिक संतुलन तर ठेवतीलच शिवाय तुम्हाला यशाकडे प्रवृत्त करतील असा त्यांचा विश्वास होता. चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी वेळ, शक्ती आणि पैसा खर्च करणे आवश्यक आहे. योग्य लोकांवर केलेला हा खर्च तुम्हाला मानसिक समाधान आणि जीवनात स्थिरता देईल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही.