शपथविधी महायुतीचा पण चर्चा फक्त पंकजा मुंडेंची, सोहळ्यात त्या क्षणी काय घडलं?
नागपूर : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी मंत्री पंकजा मुडे यांनी २०१९ पासून मंत्रिपदापासून दूर होत्या. पण अखेरीस आज तो दिवस उजाडला. आज पंकजा मुंडे यांनी महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
यावेळी कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी करून शपथविधी सोहळ्यात परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांच्या घोषणांचा आवाज इतका होता की खुद्द पंकजा मुंडेंना थांबवं लागलं.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. त्या दिवसापासून पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणात बाजूला झाल्या होत्या. भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रीय सचिव अशी जबाबदारी सोपवली होती. पण पंकजा मुंडे यांचं लक्ष होतं मंत्रालयाकडे. मध्यंतरी लोकसभा निवडणूक लढवण्याचे पंकजा मुंडे यांना पक्षाने आदेश दिले. पंकजा मुंडे यांनी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली पण मराठा समाजाच्या आंदोलनाचा पंकजा मुंडेंना फटका बसला आणि त्या पराभूत झाल्या.
त्यानंतर भाजपने पंकजा मुंडे यांचा सन्मान राखत विधान परिषदेवर त्यांना आमदार म्हणून निवडून आलं. पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमदार म्हणून समोर आल्या. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकून आपणच मोठे भाऊ असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे शपथविधी भाजपचा वरचष्मा होता. भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाची संधी दिली.
आज नागपूरमध्ये पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जेव्हा पंकजा मुंडे या शपथ घेण्यासाठी माईकजवळ पोहोचल्या तेव्हा समर्थकांनी पंकजाताई आगे बढो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शपथविधी सोहळ्यात कार्यकर्त्यांच्या घोषणेमुळे खुद्द पंकजा मुंडे काही वेळ थांबल्या होत्या. ‘मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे…’असं म्हणत ईश्वर साक्ष पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पंकजा मुंडे या 2014 मध्या युती सरकारमध्ये महिला आणि ग्रामविकास मंत्री होत्या. त्यामुळे आता देवाभाऊंच्या टीममध्ये पंकजा मुंडे यांना कोणतं मंत्रिपद मिळतं हे पाहण्याचं ठरणार आहे.