क्राईम

बायको प्रेग्नेट झाली अन् ACPचं पितळ उघडं पडलं, बलात्काराच्या घटनेत कसा अडकला जाळ्यात?


Crime News : देशभरात बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र या घटनेने पोलिसांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कारण एका एसीपीने पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे.

 

लग्नाचं आमिष दाखवून या एसीपीने विद्यार्थीनीसोबत असे घाणेरडे कृत्य केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे संबंधित एसीपी हा विद्यार्थीनीसोबत पीएचडीचे शिक्षण घेत होता. या घटनेत पीडित विद्यार्थीनीच्या एका मित्राने पोलिसांचं पितळ उघड केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतायत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या कॉलेजमध्ये एसीपी मोहसीन खान पीचडीचे शिक्षण घेत होते. हे शिक्षण घेत असताना मोहसीन खान यांचे एका विद्यार्थीनीसोबत प्रेम जुळले होते. प्रेम जुळल्यानंतर एसीपींनी तरूणीला लग्न करण्याचे आमिष दाखवत तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले होते. यानंतर विद्यार्थीनीला ज्यावेळेस तिच्या मित्राने एसीपींच्या संबंधित काही गंभीर पुरावे दाखवले, त्यानंतर विद्यार्थीनीच्या पायाखालची जमीनच सरकली होती.

 

डीसीपी साऊथ अंकिता शर्मा यांना पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, एसीपी मोहसीन खान यांनी आयआयटीच्या कॅप्मसमध्ये माझ्यासोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले होते. एसीपींनी त्याचं पहिलं लग्न झाल्याची माहिती माझ्यापासून लपवून ठेवली. आणि लग्नाचं आमिष दाखवून माझ्यावर अत्याचार केला होता, असा आरोपी विद्यार्थीने केला आहे.

 

या घटनेनंतर माझ्या एका मित्राने एसीपींचे लग्न झाल्याचे फोटोग्राफर मला दाखवले होते. या लग्नाबाबत मी त्यांना जाब विचारला असता त्यांनी कुटुंबियांच्या दबावातून माझं लग्न झाल्याची माहिती दिली. आमचा तलाक सूरू आहे.हा तलाक झाल्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करेन, असे आश्वासन मला एसीपींनी दिल्याचे पीडीत विद्यार्थीनी सागितले.

 

या घटनेनंतर पीडीतेच्या मित्राला एसीपीची बायको प्रेग्नेंट असल्याची माहिती मिळते. ही माहिती मित्र विद्यार्थीनीला सांगताच तिला आपली फसवणूक झाल्याचे कळून चुकते. याबाबत विद्यार्थींनी एसपींना विचारले असता, मला कुटुंबियांच्या दबावामुळे बायको सोबत संबंध प्रस्थापित करावे लागले. एसीपींचे हे उत्तर ऐकूण पिडितेला आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते. या घटनेनंतर पीडिता या घटनेची माहिती पोलिस कमिश्नर आणि आयआयटीच्या प्रोफेसरांना देते. यादरम्यान एसीपीचं हे सगळं पितळ उघडताच तो विद्यार्थीनीवर मानसिकरित्या आजारी असल्याचा आरोप करतो. त्यामुळे या प्रकरणाने खूपच खळबळ माजली आहे.

 

या प्रकरणी आता एसीपी मोहसीन खानवर रेपसह अनेक कलमाअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात एसआयटीही गठीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button