एकनाथ शिंदे विरोधी पक्षात? सत्ता अन् विरोधी पक्षही आपला… भाजपचा कट काय? महाराष्ट्रात खळबळ माजवणारा दावा!
महाराष्ट्रातील राजकारणात एकनाथ शिंदे यांची भूमिका एकदम बदलल्याच्या चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख विरोधी पक्षांतील नेतृत्वावर गंभीर शंका व्यक्त केली आहे, ज्यामुळे सत्ताधारी भाजपच्या नव्या राजकीय खेळीवर नवा वाद निर्माण झाला आहे
अंजली दमानिया यांनी भाजपवर आरोप करत सोशल मिडिया हँडल एक्सवर त्यांचं मत मांडलं, तेव्हापासून महाराष्ट्रात राजकीय गोंधळ वाढताना दिसत आहे.
भाजपचा विरोधी पक्ष संपवण्याचा कट?
अंजली दमानिया यांनी भाजपवर आरोप करत म्हटलं की, “भाजपने सत्तेची खेळी करत केवळ आपली सत्ता राखलीच नाही, तर विरोधी पक्ष देखील आपला ठरवला आहे. भाजपच्या पक्षीय रणनीतीत विरोधी पक्षांना नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाकी पक्ष आणि विरोधी पक्ष नेतातच अस्तित्वात ठेवायचे नाहीत.”
एकनाथ शिंदेचे बदलते सूर आणि गोंधळ
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी एकदम वेगळं वागणं सुरू केलं आहे. त्यांचे सुर बदलले असून ते गावी जात आहेत, तिथे आजारी पडत आहेत, परत बरे होतात नंतर ठाण्यात परत येतात काही बैठका घेऊन परत आजारी पडतात. आजारी पडल्याने डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे, अशी माहिती शिंदे यांच्याकडून दिली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या या वर्तमनात बदलांमुळे विरोधी पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
महाविकास आघाडीतील संघर्ष-
महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये विरोधी पक्षनेता पदावर घसरलेली परिस्थिती देखील लक्षात घेतली पाहिजे. महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडे २९ जागा नसल्याने, विरोधी पक्षनेता पद देणं शक्य नाही. यामुळे विरोधी पक्षातील नेतृत्वावर संकट आलं आहे. एका बाजूने भाजप आपला माणूस विरोधी पक्षनेता म्हणून बसवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीतील नेता विरोधी पक्ष म्हणून बसावा अशी मागणी केली जात आहे.
भाजपचा विरोधी पक्षाला नष्ट करण्याचा कट?
दमानिया यांच्या आरोपांनुसार, भाजपचा उद्देश विरोधी पक्ष संपवण्याचा आहे. “महाविकास आघाडीला युतीमधून विरोधी पक्षनेता द्यायचा आहे, परंतु युती मध्ये कोणताही विरोधी पक्षनेता ठेवायचा नाही. आपला माणूस विरोधी पक्षनेता म्हणून बसवावा, आणि विरोधी पक्ष नष्ट व्हावा,” असं त्यांनी ट्विट करत भाजपला लक्ष्य केलं. यामुळे भाजपच्या राजकीय कर्तृत्वावर एक नवा वाद उभा राहिला आहे, आणि महाराष्ट्रातील राजकारणात नवा गोंधळ माजवण्याची शक्यता वाढली आहे.
भविष्याचा कडवट संघर्ष?
सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष, खास करून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात, हे भविष्यातील राजकारणात मोठे वळण घेऊ शकते. एकनाथ शिंदे आणि त्यांचे नेतृत्व हे भाजपच्या योजनांचे एक भाग असू शकतात का? की महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष नेत्यांवरील संघर्ष वाढत जाईल? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत, आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात मोठा उलथापालथ होऊ शकतो.