पृथ्वीवरील सर्वात मोठी सोन्याची खाण ‘या’ देशात सापडली; अमेरिकेसारखा गडगंज देशही हडबडला
पृथ्वीवरील सर्वात मोठी सोन्याची खाण चीनमध्ये सापडली आहे (World’s largest gold reserve) . चीनमध्ये सापडलेला हा सोन्याचा साठा पाहून अमेरिकेसारखा गडगंज देशही हडबडला आहे.
या सोन्याच्या खाणीमुळे चीनची आर्थिक क्षमता आणखी वाढणार आहे. खाणीत सापडलेल्या या सोन्याच्या किंमतीचा आकडा पाहून डोळे गरगरतील.
चीनमधील पिंग्झियांग काउंटी येथे ही सोण्याची खाण सापडली आहे. हुनान प्रांताच्या जिओलॉजिकल ब्युरोने सोन्याची खाण सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी देखील याची पुष्टी केली आहे. या सोन्याच्या खाणीची किंमत 600 अब्ज युआन म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 6 लाख 76 हजार कोटी रुपये इतकी आहे. या जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असू शकते असा दावा केला जात आहे. कारण दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण डीप माइनमध्ये 930 पेक्षा जास्त मेट्रिक टन सोनं सापडले आहे.
चीनमधील पिंग्झियांग काउंटी येथे जमिनीखाली गोल्डन व्हेन अर्थात सोन्याच्या धारा सापडल्या आहेत. प्राथमिक शोधात 2 किलोमीटर खोलीवर 40 गोल्डन व्हेन सापडल्या आहेत. यामध्ये 300 मेट्रिक टन सोने असू शकते. हा संपूर्ण साठा एकत्र केला तर या ठिकाणी सुमारे 1,000 मेट्रिक टन उच्च दर्जाच्या खनिजाचा साठा आहे. भूगर्भातील विविध भूवैज्ञानिक प्रक्रियांमुळे सोन्याचे साठे तयार होतात. नव्याने सापडलेल्या या सोन्याच्या खाणीमुळे चीनच्या खाणकाम आणि आर्थिक क्षमतांना चालना मिळणार आहे.
जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी
दक्षिण खोल सोन्याची खाण – दक्षिण आफ्रिका
ग्रासबर्ग सोन्याची खाण – इंडोनेशिया
ऑलिम्पियाडा सोन्याची खाण – रशिया
लिहिर सोन्याची खाण – पापुआ न्यू गिनी
नॉर्टे अबिएर्टो सोन्याची खाण – चिली
कार्लिन ट्रेंड सोन्याची खाण – यूएसए
बोडिंग्टन सोन्याची खाण – वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
मपोनेंग सोन्याची खाण – दक्षिण आफ्रिका
पुएब्लो व्हिएजो सोन्याची खाण – डोमिनिकन रिपब्लिक
कॉर्टेझ सोन्याची खाण – यूएसए