महायुती सरकारची ‘लाडकी बहीण योजना’ – अर्ज प्रक्रियेला पुन्हा सुरवात, महिलांना देण्यात येणार १,५०० रुपये
महायुती सरकारची ‘लाडकी बहीण योजना’ – अर्ज प्रक्रियेला पुन्हा सुरवात, महिलांना देण्यात येणार १,५०० रुपये महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपर्यंत आहे, अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. 18 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. महिला सशक्तीकरणाचा उद्देश घेऊन ही योजना सुरु केली गेली आहे, ज्यामुळे महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्या पर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले गेले आहेत, आणि डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची रक्कम लवकरच जमा होईल.
या योजनेची लोकप्रियता वाढल्यामुळे ती राज्य विधानसभा निवडणुकीत एक महत्त्वाचा मुद्दा ठरली. महायुतीने यावर आपला विजय सुनिश्चित करण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठा दिलासा दिला. योजनेसाठी विरोधकांनी टीका केली असली तरी, महायुतीने प्रत्युत्तर देताना योजनेत दीड हजार रुपयांचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, महाविकास आघाडीकडूनही महिलांना तीन हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. या वादविवादानंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे महिलांना अधिक आर्थिक मदत मिळणार आहे.
आता, आचारसंहिता संपल्यानंतर, ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. अर्ज करणाऱ्या महिलांची छानणी बाकी असलेल्या अर्जांची प्रक्रिया जलद गतीने केली जाणार आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करून पुनः अर्ज भरायचे आहे, अन्यथा महिलांना लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात.