ताज्या बातम्या

अमेरिकेतील ‘या’ शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण काय ?


सूर्य आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा गृह आहे. सूर्याशिवाय आपण आपण आपली दैनंदिन कामे तर करू शकत नाही. तसेच, जास्त दिवस सूर्याची किरणे आपल्या शरीरावर न पडल्यास आजारपणालाही तोंड द्यावे लागू शकते.

हिवाळ्यात एक दिवसही सूर्य उगवला नाही, तर आपल्याला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लाग शकतो. पण, जगात एक अशी जागा आहे, जिथे हिवाळ्याच्या काळात सलग 64 दिवस सूर्य उगवत नाही.

 

अमेरिकेतील अलास्का येथे उत्कियाग्विक नावाचे एक छोटेसे शहर आहे. या शहरात सुमारे 2 महिने सूर्य उगवणार नाही. उत्कियाविकमध्ये शेवटचा सूर्योदय 18 नोव्हेंबर रोजी झाला होता. आता या शहरात बरोबर 64 दिवसांनी, म्हणजेच 2 जानेवारीला सूर्य उगवेल. हे शहर 64 दिवस अंधारात राहणार आहे. आर्क्टिक समुद्राजवळ अलास्काच्या उत्तरेला असलेल्या उत्कियाग्विकमध्ये सुमारे 5 हजार लोक राहतात. अत्यंत उत्तरेकडील स्थानामुळे या शहरात दरवर्षी दोन महिने सूर्योदय होत नाही. 18 नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:27 वाजता सूर्य मावळला होता.

 

हे कसं शक्य आहे?
पृथ्वी आपल्या अक्षावर 23.5 अंश झुकलेली आहे, त्यामुळे सूर्यप्रकाश तिच्या एका भागापर्यंत पोहोचत नाही. यामुळे पृथ्वीच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भागात दरवर्षी ध्रुवीय रात्र येते. म्हणजे, या भागात दरवर्षी एक वेळ येते, जेव्हा सूर्योदय अनेक दिवस होत नाही. ध्रुवीय रात्रीचा कालावधी 24 तासांपासून सुमारे 2 महिन्यांपर्यंत असू शकतो. पण, कृत्रिम प्रकाशामुळे(बल्ब) शहर अंधारात राहणार नाही.

 

3 महिने सूर्य मावळणार नाही
विशेष म्हणजे या शहरात जसा 2 सूर्योदय होत नाही, तसा 3 महिने सूर्यास्तही होत नाही. 11 मे ते 19 ऑगस्ट दरम्यान उत्कियाग्विकमध्ये सूर्यास्त होत नाही. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर स्थित अनेक भागात असे घडते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button