अजित पवार विनासुरक्षा ‘देवगिरी’तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग
राज्यात एकीकडे सत्तास्थपानेची धावपळ सुरु असताना दुसरीकडे अजित पवार हे अचानक देवगिरी बंगल्यातून विनासुरक्षा बाहेर पडले आहेत. ते दिल्लीला गेले असल्याचं बोललं जातंय.
मात्र ते नेमकं कुठे गेले, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
विधानसभा निवडणुकीत कुणी किती जागा जिंकल्या?
महायुती- २३०
भाजप- १३२
शिवसेना- ५७
राष्ट्रवादी- ४१
महाविकास आघाडी- ४६
काँग्रेस- १६
शिवसेना (उबाठा)- २०
राष्ट्रवादी (श.प.)- १०
—-
समाजवादी पक्ष- ०२
इतर- १०
मुख्यमंत्री पदासाठी तिन्ही पक्षांकढून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतंय. एकीकडे एकनाथ शिंदेंचं समर्थक थेटपणे मुख्यमंत्री पद मागत आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांचे समर्थक आक्रमक होत आहेत. भाजपचे पदाधिकारीही मागे नाहीत.
दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन बैठकांचं सत्र सुरु असल्याची माहिती आहे. राज्यातील नेतेही दिल्लीला जाणार आहेत. मुख्यमंत्री पद अजित पवारांना मिळेल आणि शिंदेंना केंद्रास संधी मिळेल, अशीही एक मांडणी केली जातेय.
विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचं समजतंय. अमित शाहांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या विधीमंडळ गटनेत्याची निवड होईल आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला जाईल, असं बोललं जातंय. याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
मात्र अजित पवार विनासुरक्षा गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी अजित पवार नॉट रिचेबल झालेले महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.