भारतातील अशी रेल्वे स्टेशन ज्यांचं नावही घ्यायला लाज वाटेल, मुंबईतलंही आहे एक Station
भारतात रेल्वेचं सर्वात मोठं जाळं आहे. जिथे अगदी बससेवाही पोहोचू शकत नाही अशा अगदी लहान लहान गावांना रेल्वेनं जोडलं आहे. अशी काही गावं आहेत ज्यांची नावं विचित्र आणि अजब आहे.
काही गावांची नावं घेताना हसू आवरत नाही. तर काही गावं आणि रेल्वे स्टेशनची नावं इतकी विचित्र आहेत की घ्यायलाही लाज वाटेल. आज अशाच काही गावांची नाव आपण पाहणार आहोत.
भारतात हजारो रेल्वे स्थानके आहेत. पाहिलं तर रेल्वे आता भारताच्या लाईफलाईनचा महत्त्वाचा भाग बनली आहे. आपल्या देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या रेल्वे प्रवासावर अवलंबून आहे. म्हणजेच भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा रेल्वे नेटवर्क असलेला देश आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास केला असेल तर तुम्ही पाहिलं असेल की, तुम्हाला स्टेशन्सची नावं अनेकदा काळ्या अक्षरात पिवळ्या बोर्डवर दिसली असतील. अनेक स्थानकांची नावे खूप विचित्र नावे आहेत.
कुत्ता स्टेशन
कुत्ता हे एका स्टेशनचं नाव आहे. कर्नाटक राज्यातील गुट्टा या छोट्या गावाजवळ आहे, जे कूर्ग क्षेत्राच्या काठावर वसलेले आहे. हे नाव आपण रोज ऐकतो पण रेल्वे स्टेशनचे नाव खूप विचित्र वाटतं.
हलकट्ट रेल्वे स्टेशन
हे नाव ऐकूनच कसतरी होतं. हे स्टेशनही कर्नाटकात आहे. सेवालाल नगरजवळ हे स्टेशन येतं. घनदाट जंगल आणि निसर्गाचं भरभरुन देणं असलेलं गाव या स्टेशनच्या जवळ आहे.
फफूंद रेल्वे स्टेशन
उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यात फफूंद नावाचं स्टेशन आहे. भारतातील हे टॉपक्लास स्टेशन मानलं जातं कारण त्याचा कोड PHD आहे. हे स्टेशन ब्रिटिशांच्या काळात उभारण्यात आलं होतं. प्रयागराज रेल्वे डिव्हिजनमधील सर्वात महत्त्वाचं स्टेशन आहे.
टिटवाला रेल्वे स्टेशन
टिटवाळा हे देखील एका रेल्वे स्थानकाचे नाव आहे. मुंबईच्या सेंट्रल लाईनवरील एक स्टेशन जे कल्याण आणि कसाना दरम्यान आहे. हे रेल्वे स्थानक स्वातंत्र्यापूर्वी बांधण्यात आले होते. जे आंबिवली रेल्वे स्टेशन आणि खडवली रेल्वे स्टेशन दरम्यान आहे.
कोमागाटा मारू बज बज रेल्वे स्टेशन
हे स्थानक भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वे विभागात सियालदह रेल्वे विभागांतर्गत महत्त्वाचं स्टेशन आहे. कोलकाता उपनगरी रेल्वे स्थानक आहे.
पनौती रेल्वे स्टेशन
नवीन रेल्वे स्टेशनमुळे इथल्या लोकांना पनौती म्हणत चिडवतात. पनौती हे यूपीच्या चित्रकूट जिल्ह्यात असलेले एक छोटेसे गाव आहे ज्याची लोकसंख्या खूपच कमी आहे.