रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, घडल काय?

रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती सुटकेस ठेवून निघून जायला लागला. हे आजूबाजूच्या लोकांच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आल्यानंतर सुटकेस उघडण्यात आली.
सुटकेस उघडल्यानंतर महिलेचा मृतदेह बघून सर्वांना दरदरून घाम फुटला. या प्रकरणात पोलिसांनी सुटकेस ठेवून गुपचूप पळून जात असलेल्या बाप-लेकीला पोलिसांनी अटक केली.
तामिळनाडूतील मिंजूर रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. रेल्वे स्थानकावरील सजग प्रवाशांमुळे वेळीच हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली.
४३ वर्षीय बालासुब्रमण्यम आणि त्याची १७ वर्षीय मुलगी सोमवारी रात्री (३ नोव्हेंबर) रात्री एक मोठी सुटकेस घेऊन मिंजूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यानंतर काही वेळाने सुटकेस रेल्वे स्टेशनवर ठेवून दोघेही गुपचूप जायला लागले.
दोघेही सुटकेस सोडून निघून जात असल्याचे रेल्वे स्थानकावरील काही प्रवाशांना दिसलं आणि त्यांनी ही गोष्ट पोलिसांच्या कानावर घातली. आरपीएफ अधिकाऱ्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून लगेच सुटकेस ताब्यात घेतली.
पोलिसांनी सुटकेस उघडायला सांगितलं अन्…
रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती कोरूक्कुपेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आले आणि बालासुब्रमण्यमला फोन केला. त्याला बोलवून घेण्यात आलं. सुटकेसमध्ये काय आहे, असं पोलिसांनी त्याला विचारलं. त्यावर तो अडखळा, त्यामुळे पोलिसांनी त्याला सुटकेस उघडायला सांगितलं.
सुटकेस उघडल्यानंतर सुटकेसमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह प्लास्टिकने गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला. महिलेच्या डोक्यात जखम झालेली होती. हे सगळं उघड झाल्यानंतर पोलिसांनी बालासुब्रमण्यम आणि त्याच्या मुलीला अटक केली. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली आहे.