क्राईम

नवरा परदेशात, बॉयफ्रेंडसोबत हनिमून चाललेला आणि.लव्ह स्टोरीचा खतरनाक अंत, नेमक घडल काय ?


विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवणं, एका युवकाला चांगलच भारी पडलं. या अनैतिक संबंधांमुळे त्याला त्याचे प्राण गमवावे लागले. निशा कुमारीचा पती राहुल दुबईमध्ये नोकरीला आहे. नवरा परदेशात असल्याने निशाचे टेटिया बम्बर गावात राहणाऱ्या रोहित कुमार सोबत सूर जुळले.

रोहित रोज निशाच्या घरी येऊ लागला. रोहित आणि निशाच अफेयर सुरु झालं. पण या दरम्यान असं झालं की, निशाने रोहितची हत्या केली. बिहारच्या बांकामधील धरमपुर गावातील हे प्रकरण आहे.

 

12 दिवस आधी रोहित अचानक गायब झाला. त्याच्या नातेवाईकांनी निशावर हत्येचा आरोप केला. आधी निशाने पोलिसांची दिशाभूल केली. पण पोलिसांनी आपला खाक्यात दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. निशाने काही जणांच्या मदतीने मिळून रोहितची हत्या केली. 21 ऑक्टोंबरला रोहित निशाला भेटण्यासाठी आला होता. पण तो घरी परतलाच नाही. त्यानंतर रोहितच्या कुटुंबियांनी निशावर हत्येचा आरोप केला.

 

निशाच्या घरी येणं-जाणं खूपच वाढलं

रोहितचे निशासोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बऱ्याचदा समजवूनही रोहित ऐकला नाही. त्याने निशासोबत अफेयर सुरु ठेवलं. निशाचा पती या दरम्यान नोकरीसाठी दुबईला निघून गेला. रोहितच त्यावेळी निशाच्या घरी येणं-जाणं खूपच वाढलं. लोकांमध्ये चर्चा सुरु झाली. निशाच्या कुटुंबियांना याबद्दल समजल्यानंतर ते संतापले. एक दिवस रोहित निशाला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी नातेवाईकांनी दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं. खूप गोंधळ झाला. पण प्रकरण मिटलं.

 

तो बेपत्ता असल्याची तक्रार

21 ऑक्टोंबरला रोहित आपली बाइक नवादा येथे एका नातेवाईकाच्या घरी सोडून निशाला भेटण्यासाठी धरमपुरला गेला. तो परतला नाही, त्यावेळी रोहितच्या कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबियांनी तात्काळ तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. निशासह तिच्या कुटुंबांवर हत्येचा आरोप केला.

 

फक्त सांगाडा उरला होता

दबाव वाढल्यानंतर निशाने कोर्टात आत्मसमर्पण केलं. चौकशीत निशाने हत्येची कबुली दिली. धरमपुरला राहणारा बिट्टू कुमार आणि त्याचे काही सहकारी हत्येत सहभागी असल्याच निशाने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी छापेमारी करुन बिट्टूला अटक केली. बिट्टूने दिलेल्या माहितीच्या आधारवर रोहितचा मृतदेह सापडला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. फक्त सांगाडा उरला होता. पोलीस आता या हत्येच्या मागच्या कारणांचा शोध घेत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button