राजकीय

“ताई आहे का घरातं, तुतारी आलीया दारातं..”, बापूसाहेब पठारे यांचा प्रचार शिगेला


4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी, अनेक ठिकाणी अजूनही बंडखोर आपल्या भूमिकांवर ठाम आहेत.
त्यामुळे आता राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे.

वडगाव शेरी (wadgaon Sheri) विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे असणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी देखील उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. दिवाळीमुळे मंदावलेला प्रचाराने आता पुन्हा एकदा वेग घेतला आहे. “ताई आहे का घरातं, तुतारी आलीया दारातं,” अशा प्रकारची गाणी गात घरोघरी पठारेंचा प्रचाराला सुरुवात केली आहे.

मंगळवारी सकाळी तर वडगाव शेरी परिसरात प्रचाराची दिंडी पाहायला मिळाली. टाळ मृदुंग आणि तुतारीच्या गजरात बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांचा प्रचार सुरू होता. तर काही नागरिकांनी ताई आहे का घरात तुतारी आली या दारात अशा प्रकारची गाणी गाऊन मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जातोय.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे आणि (अजित पवार) राष्ट्रावादी काँग्रेस सुनील टिंगरे यांच्यात लढत होणार आहे. बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी मिळणार हे खूप आधीच स्पष्ट झाले होते.

 

त्यामुळे त्यांनी आधीपासूनच घरोघरी भेट देत प्रचाराला सुरुवात केली होती. तर सुनील टिंगरे यांची उमेदवारी शेवटच्या टप्प्यात जाहीर झाली. तत्पूर्वी महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार यावर चर्चा झाली. अखेर सुनील टिंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उमेदवारी मिळाल्यानंतर सुनील टिंगरे हे देखील प्रचारात सक्रिय झाले. त्यामुळे वडगाव शेरीत या दोन्ही उमेदवारांच्या रूपाने काटे की टक्कर पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button