देश-विदेश

सावत्र मुलांना दिले आईचं प्रेम, कमला हॅरिस याचं खाजगी जीवन नेमकं कसं?


अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. सर्वेक्षणात डेमोक्रेटिक उमेदवार कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असे दावे केले जात आहे.

आता सध्या त्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. कमला हॅरिस यांची आई एक तामिळ ब्राह्मण आहे. तर त्यांचे वडील आफ्रीकन मुळ असलेले अमेरिकन नागरिक होते. कमला हॅरिस यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. त्यांचे खाजगी जीवन सर्वसामान्य नव्हते.

 

कमला हॅरिस यांचा जन्म ऑक्टोबर 1964 रोजी कॅलिफोर्निया येथीस ऑकलॅंड येथे झाला होता. त्यांची आई श्यामला गोपालन एक तामिळ ब्राह्मण होत्या. श्यामला 19 व्या वर्षीच त्या अमेरिकेला गेल्या. तेथे त्यांची भेट डोनाल्ड हॅरिस यांच्याशी झाली.ते जमायका येथील अश्वेत होते. अमेरिकेत कृष्णवर्णीयांचे आंदोलन जोरात होते. अशा दोघांचे विचार जुळले. पाच वर्षांच्या अफेअर नंतर त्यांनी साल 1963 मध्ये लग्न केले.

 

आई-वडील वेगळे झाले

श्यामला आणि डोनाल्ड हॅरिस यांना दोन मुली झाल्या. मोठी मुलगी कमला आणि छोटी माया. परंतू लग्नानंतर काही वर्षांत कमला यांचे आई-वडील यांच्या भांडणे सुरु झाली. आणि नऊ वर्षांचा संसार करुन ते वेगळे झाले. तेव्हा कमला यांचे वय केवळ सात वर्षे होते. काही दिवस कोर्टात केस चालली नंतर त्यांचा घटस्फोट झाला. कोर्टाने मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी श्यामला यांच्याकडे सोपविली. श्यामला यांनी त्यांना भारतीय संस्कार आणि संस्कृती शिकविली. घटस्फोटानंतर श्यामला या कॅनडा येथे गेल्या. आणि तेथे युनिव्हर्सिटीत शिकवू लागली. कमला यांनी कॅनडात शिक्षण घेतले आणि त्या अमेरिकेत गेल्या.

 

उच्च शिक्षण घेतले

हार्वर्डमधून राज्यनिती शास्रात ग्रॅज्युएट केल्यानंतर कमला हॅरिस यांनी कोलंबिया विद्यापीठातून कायद्याचा अभ्यास केला आणि तेथे वकीलांसोबत काम करु लागल्या. तेथे त्यांची भेट विली ब्राऊन यांच्याशी झाली. त्यावेळी विली कॅलिफोर्नियात विधानसभा अध्यक्ष होते. दोघांमधील अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

विली यांच्याशी नाते ठेवल्याने त्यांच्यावर कुटुंब तोडल्याचा आरोप झाला. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर आरोप अफेअरच्या मार्गावर राजकारणात आल्याचा आरोप करीत असतात. साल 2003 मध्ये कमला यांनी पहिल्यांदा सॅनफ्रान्सिस्को येथे जिल्हा अटर्नीची निवडणूक लढली. त्याआधी सात वर्षे विली आणि कमला यांचे नाते संपले होते. त्यांच्यावर विली यांच्याशी संबंध स्थापून दोन सरकारी पदे मिळविल्याचा आरोप होत असतो.

 

सावत्र मुलांना प्रेम दिले

कमला हॅरिसयांचे दुसरे अफेअर एंकर मोंटेल विलियम्स यांच्याशी होते. ते देखील घटस्फोटीत होते. ते दोघे अनेक सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र असायचे. साल 2010 मध्ये कमला हॅरिस कॅलिफोर्नियाच्या राज्य अटॉर्नी बनल्या. त्यांचे तिसरे अफेर डगलस एमहॉप यांच्याशी झाले जे लग्नापर्यंत पोहचले. ते देखील घटस्फोटीत होते. त्यांचे पहिले लग्न क्रिस्टेन यांच्याशी झाले होते. तिच्यापासून त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाले होते. कमला यांना डगलस यांच्यापासून मुले झाली नाहीत. त्यांनी सावत्र मुलांना आईचे प्रेम दिले.

 

राजकारणात वेगाने प्रगती

कमला हॅरिस यानी साल 2016 मध्ये राजकारणात प्रवेश केला. तेव्हा डोनाल्ड ट्रंम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते.त्या सिनेटमध्ये निवडून आल्या. त्यानंतर साल 2019 मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आपले नाव पुढे केले. पार्टीच्या आत डीबेटमध्ये त्या बायडन सोबत हरल्या. त्यानंतर त्यांनी त्यांचे नाव मागे घेतले. परंतू साल 2020 मध्ये कमला हॅरिस यांना बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले. त्या निवडणूक जिंकल्या. राजकारणात त्या वेगाने पुढे गेल्या. आता त्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. जर त्या जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष असतील…


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button