एका रात्रीत जरांगे थंड, दबाव कुणाचा? म्हणाले, “…तर त्याच्या घरी जाऊन डोक्यात गोटा टाकेन, निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपवू
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत आपणही आपले उमेदवार उतरवणार, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली होती. यानुसार त्यांनी, रविवारी कोण-कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार आणि कोणत्या ठिकाणी उमेदवार पाडणार, यासंदर्भातही माहिती दिली होती.
मात्र, एका रात्रीतून ते थंड अथवा शांत झाले आणि त्यांनी निवडणुकीतून सपशेल माघार घेतली. तसेच, निवडून येऊन संपवण्यापेक्षा, पाडून संपवू. दोन्हीतही आम्हाला सारखाच आनंद. असे त्यांनी म्हटले आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.
निवडणूक प्रक्रियेत एका रात्रीतून आपण शांत झालात, महायुतीकडून काही दवाव होता, महाविकास आघाडीकडून काही दबाव होता, हे दबावापोटी झाले की आणखी काही? असे विचारले असता जरांगे म्हणाले, “तुम्हाला पत्रकारीतेच्या पलिकडे जाऊन एक गोष्ट माहीत आहे, माझी मान कापली गेली तरी हा नमुना हाताला लागू शकत नाही आणि दबाव म्हटलं, तर डोक्यातच गोटाच घालेन मी त्याच्या. महायुतीचा दवाब आला अथवा महाविकास आघाडीचा दबाव आला, तरी यंत्रनाही त्यांच्या जवळच आहेत आता. मोबाईल फोनही येतात. मला जर फोन आलाना तर त्याच्या घरी जाऊन मी त्याच्या डोक्यात गोटा टाकेन. सोडणार नाही, ते तसले धंदे नाही. यादीच नाही आली (मित्र पक्षांची यादी), आता त्यात काय? आहे ते आहे.”
“निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपवू; दोन्हीतही आम्हाला सारखाच आनंद” –
“आपण म्हणालात, दबाव आला की काय? तर मी बदलत नाही कधीच. आपण म्हणालात की, निवडणुकीत तुम्हाला उच्चांक गाठायचा होता, त्याचे काय? तर आम्हाला निवडून येऊन वर यायचे होते. आमचे निवडून आले, त्याला पाडले, तो गेला. म्हणजे आम्हाला संपवणाराच संपवायचा होता. त्याला काय, निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपवू. दोन्हीतही आम्हाला सारखाच आनंद,” असे जरांगे यांनी म्हटले आहे.