महाविकास आघाडी की महायुती! महाराष्ट्रात सत्ता कुणाला मिळणार? या ‘सर्व्हे’चे धक्कादायक अंदाज
विधानसभा निवडणुकीची धुमश्चक्री सुरु असून जवळपास आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात काही उमेदवार आपले नामांकन अर्ज मागे घेऊ शकतात. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोनच दिवसांचा अवधी उरला आहे.
अशा स्थितीत महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याचीच चर्चा आहे, अशातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे पुढे आला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे समोर आले आहे.
लोकसभेला महाविकास आघाडी वरचढ
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने बाजी मारली या निवडणुकीत राज्यातील 48 पैकी 30 जागा महाविकास आघाडीच्या पदरात पडल्या होत्या , तर महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी (MVA) बाजी मारेल असा प्री-पोलचा सर्व्हेमध्ये समोर आले आहे.
काय सांगतो ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे
ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला तब्बल 157 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एका अर्थाने महाविकास आघाडीची सत्ताच येणार असल्याचे हा पोल सांगतो तर सत्ताधारी महायुतीला केवळ 117 जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्व्हेमधून वर्तविण्यात आला आहे, म्हणजेच हाती आलेली सत्ता महायुती गमावणार असे हा पोल सांगतो.
भाजप ठरणार मोठा पक्ष
महायुतीत पुन्हा एकदा सर्वांधिक जागा भाजपला मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. भाजपला 79 जागा मिळतील असा दावा या सर्व्हेतून करण्यात आला आहे. महायुतीमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून त्यांना विधानसभा 2024 च्या निवडणुकीत 23 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 14 जागा मिळतील असेही या पोलमध्ये सांगण्यात आले आहे.
महाविकास आघाडीत कुणाला मिळू शकतात किती जागा
ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेला काँग्रेस सर्वात जास्त जागा घेणारा पक्ष ठरणार आहे, या पक्षाला 68 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 44 आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला 41 जागा मिळण्याचा पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही 4 जागा मिळण्याची शक्यता सर्वे सांगतो.
मविआ जाणार दिडशे पार..!
महाविकास आघाडीला 157 जागा मिळतील असा अंदाज आहे. या सर्वेनुसार मिळणाऱ्या जागा कशा वाट्याला जातील हेही सांगण्यात आले आहे.
68 जागा काँग्रेस
44 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष
41 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला
1 जागा समाजवादी पक्ष
1 जागा सीपीआय-एम
2 जागा पीडब्ल्यूपी मिळतील असा अंदाज या सर्व्हेतून वर्तविण्यात आला आहे.
महायुतीला एकूण 117 जागा
या सर्वेनुसार मिळणाऱ्या महायुतीला एकूण 117 जागा जागा मिळतील असा अंदाज आहे. यात या जागा कोणत्या पक्षाला किती मिळतील हेही सांगण्यात आले आहे.
महायुतीला एकूण 117 जागा मिळतील
79 जागा महायुतीमध्ये भाजपला
23 जागा शिवसेना (शिंदे गट)
14 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
1 जागा इतर पक्षाला मिळेल असा अंदाज
अपक्ष व इतर पक्षांना 14 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजाकडे लागले आहे.