मुख्याध्यापकच तिच्या प्रेमात पडला, शाळेतच बायकोनं पकडलं, मग काय?
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातल्या खिरहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका सरकारी शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. तिथे शाळेचा मुख्याध्यापक आणि शाळेमध्ये स्वयंपाक करण्यासाठी असलेल्या महिलेला एकमेकांशी अश्लील चाळे करताना मुख्याध्यापकाच्या पत्नीनं रंगेहाथ पकडलं आहे.
त्यानंतर मुख्याध्यापकाच्या पत्नीनं संबंधित महिलेला मारहाण केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवलं आहे.
मधुबनीत असणाऱ्या एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाचे शाळेतल्या स्वयंपाकिणीशी अनैतिक संबंध होते. ते दोघं शाळेमध्येच फ्लर्ट करत असल्याची माहिती मुख्याध्यापकाच्या पत्नीला कळली. त्यानंतर ती हातामध्ये लाटणं घेऊनच शाळेमध्ये गेली. तिथे मुख्याध्यापकाच्या पत्नीने दोघांना रंगेहाथ पकडलं. यानंतर तिने लाटण्यानं संबंधित महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. या गोंधळामुळे शाळेच्या आजूबाजूला राहणारे लोकही शाळेमध्ये गेले आणि त्यांनी मुख्याध्यापक आणि संबंधित स्वयंपाकीण महिला यांना डांबून ठेवलं. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्याध्यापक आणि संबंधित महिलेची सुटका करून हे प्रकरण मिटवलं.
शिक्षण विभागाकडून गंभीर दखल
शिक्षण विभागानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुख्याध्यापक आणि स्वयंपाकीण महिला हे दोघं जेव्हा संधी मिळेल तेव्हा शाळेमध्येच फ्लर्टिंग करत होते. गेल्या काही दिवसांपासून तर ती दोघं दररोज सायंकाळी चार वाजता शाळा सुटल्यानंतर शाळेमध्येच एकमेकांना भेटत होते. शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
शाळेत सुरू होता हायव्होल्टेज ड्रामा
मुख्याध्यापक आणि स्वयंपाकीण महिला या दोघांना मुख्याध्यापकाच्या पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत शाळेत हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. विशेष म्हणजे संबंधित स्वयंपाकीण मुख्याध्यापकांसोबतच राहण्याचा हट्ट करीत होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हे प्रकरण मिटवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापकाचे संबंधित स्वयंपाकिणीशी गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. मुख्याध्यापकाच्या पत्नीलाही याची माहिती होती. यावरून मुख्याध्यापक आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते.
दरम्यान, शाळेमध्ये हे प्रकरण घडल्यामुळे त्याची जोरदार चर्चा मधुबनी जिल्ह्यात सुरू आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणारेच चुकीच्या पद्धतीनं वागत असल्याची टीकाही करण्यात येऊ लागली आहे. संबंधित मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.