लोकशाही विश्लेषण

मृत्यू झाल्यानंतर काय दिसतं? काही क्षणांसाठी मृत्यू झालेल्या महिलेने केला खुलासा, आजुबाजूला सगळे लोक…


कॅनडामधील एम्बर नावाच्या महिलेने आपण मृत्यूनंतर काही वेळासाठी आपण आयुष्याच्या दुसऱ्या बाजूला गेले होते आणि स्वर्गाच्या दारावर उभी होती असा दावा केला आहे. मृत्यू माझ्या आयुष्यातील सर्वात अविश्वसनीय गोष्ट होती असं महिलेने म्हटलं आहे.

महिलेने तिथे जे काही घडलं किंवा गोष्टी झाल्या तो सर्व अनुभव ‘डेली स्टार’सह शेअर केला आहे.

महिलेने सांगितलं की, तिला डबल ब्रेन स्ट्रोक आला होता. डॉक्टरने तिच्या वाचण्याची शक्यता 50-50 टक्के असल्याचं सांगितलं होतं. एक वेळ अशीही आली होती जेव्हा तिच्या वाचण्याची काहीच शक्यता नव्हती. आता तिला काहीच ऐकू येणार नाही असं तिच्या कुटुंबीयांना वाटू लागलं होतं, पण ती मात्र ऐकू शकत होती. यामुळे एम्बर फार घाबरली होती. तिने सांगितलं की, हे भयानक होतं. मला आता मी खऱंच मरणार आहे असं वाटत होतं.

‘माझ्या मुलांना माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितलं जात होतं’

मी नर्सना माझ्या मुलांना सांगताना ऐकलं की, ‘आपल्या आईला जे काही सांगायचं आहे ते सांगा. तुम्ही कदाचित तिला पुन्हा पाहू शकणार नाही’. मी खरंच फार घाबरले होते आणि शांत होते. सर्वांना वाटलं की मी बेशुद्धावस्थेत काहीतरी बडबड करत आहे. पण वास्तविकदृष्ट्या मी त्यांच्याशी बोलण्यचा प्रयत्न करत होते की नेमकं काय सुरु आहे.

‘डोळे उघडले तेव्हा दुसऱ्याच ठिकाणी उभे होते’

महिलेने सांगितलं की, आपण कशाप्रकारे सर्वांना अखेरचा निरोप घेताना आणि रडताना ऐकलं. आपण जिवंत आहोत याची त्यांना कल्पनाच नव्हती. आजही मला अनुभव आलेल्या भयाण गोष्टींपैकी हे एक आहे. महिलेच्या दाव्यानुसार, हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी डोळे बंद करण्याआधी तिच्या डोळ्यावर सूर्याचा प्रकाश पडला. तिला इथपर्यंतच लक्षात आहे. यानंतर जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा दुसऱ्याच ठिकाणी होती.

“मी मुलं आणि पतीला रडताना पाहिलं”

अम्बरने दावा केला की ती तिच्या खाली तिचे भौतिक शरीर पाहू शकत होती. मी माझ्या मुलांना त्यांचे आजी-आजोबा रुग्णालयात नेत असल्याचं पाहिलं. मी माझ्या पतीला माझ्या शरीरावर रडताना पाहिले. यानंतर माझ्या लक्षात आले की मी प्रकाशाकडे जात नाही, किंवा लोक मला हाक मारत आहेत. – मी फक्त सर्वकाही आणि प्रत्येकाचे निरीक्षण करत होते. मी माझ्या कुटुंबासाठी घाबरले नव्हते, कारण मला माहित होतं की सर्व काही ठीक होणार आहे.

 

समोरच होता स्वर्गाचा दरवाजा

माझ्या आजूबाजूला एक बाग होती. जिथे मला माझ्या पायाखालचा गवत प्रत्यक्षात जाणवत होतं. मग, मी माझ्या उजवीकडे सर्वांकडे पाहिले. मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला पाहिले. डावीकडे वर्तमान आणि भविष्य होतं आणि माझा मार्गदर्शक माझ्या समोर उभा आहे.

 

माझ्या आयुष्यातील सर्व प्रियजन समोर उभे होते. मी माझ्या आजी आणि आजोबांसह सर्वांशी टेलिपॅथ पद्धतीने बोलले. माझ्या लहानपणीच्या कुत्र्यांनीही मला घेरलं होतं. मी त्यांना स्पर्श करू शकले असते, पण मी तसे केले नाही कारण मी तिथे नव्हते. मी जिथे उभे होतो त्याच्या समोरच स्वर्गाचा दरवाजा होता.

 

तिथे कोणतीही भीती नव्हती. फक्त प्रेम होतं. माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवसांसारखे वाटत होते. मी ज्यांच्यावर प्रेम केलं पण आता जगात नाहीत ते सर्व माझ्या आजूबाजूला होते. मी तिथे माझ्या आयुष्यातील आनंदी टप्पे पाहत होते. पण मला निवड करायची होती की मला माझ्या मुलांसोबत पुन्हा रहायचं आहे की या ठिकाणी राहायचं आहे जिथे मला पूर्वी कधीही शांतता भासत होती. हे खरोखर सोपं नव्हते, कारण ते घरी येण्यासारखे होतं. मला तिथून जायचं नव्हतं.

 

असे असूनही, अम्बरला अजून आपली जाण्याची वेळ जवळ आलेली नाही असं वाटलं. तिने डोळे मिटले आणि तो अचानक शरीरात परत आली. त्यानंतर तिला पुढील पंधरवड्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी सांगितले की तिला आयुष्यभर काळजी घ्यावी लागेल. आश्चर्यकारकपणे काही तासांतच ती बोलण्यास आणि चालण्यास सक्षम झाली. डॉक्टर म्हणाले की मी त्यांचा सर्वात चमत्कारी रुग्ण आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button