भारतासमोर चीनचं ही काही नाही चाललं, पाकिस्तान म्हणाला आमची इज्जत काढली
रशियातील कझान या ठिकाणी ब्रिक्स परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. या परिषदेकडे पाकिस्तानी जनतेचेही लक्ष लागले होते. कारण शिखर परिषदेत नरेंद्र मोदी यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी बैठक होणार होती.
दुसरे म्हणजे या कार्यक्रमात पाकिस्तानकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. पाकिस्तानचे राजकीय समालोचक कमर चीमा यांनी ब्रिक्स भागीदार देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश का करण्यात आला नाही, असा सवाल केला. पाकिस्तानच्या या प्रयत्नाना भारताने सुरुंग लावला. ज्यामुळे चीनचे ही काही चालले नाही. इतकंच नाही तर मोदींच्या भाषणानंतर रशियाला ही माघार घ्यावी लागली.
कमर चीमा यांनी आपल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘ब्रिक्समध्ये तेरा देशांमध्ये चर्चा झाली. ज्यामध्ये कझाकिस्तान, अल्जेरिया, बेलारूस, तुर्की, बोलिव्हिया, क्युबा, इंडोनेशिया, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश होता. हे देश पाकिस्तानपेक्षा लहान असून देखील त्यांना ब्रिक्समध्ये मान सन्मान मिळाला. पण पाकिस्तानकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.
चीनकडूनही पाकिस्तानला झटका
कमर चीमा पुढे म्हणाले की, चिनी लोकही पाकिस्तानकडे फारसे लक्ष देत नसल्याचे दिसून आले. त्यांनी भारतासोबतचे संबंध सुधारून पुढे जाण्यावर भर दिला. चीनने आपली फसवणूक केल्याचं दिसतंय. चीन आमचा खरा मित्र असला तरी त्याने आम्हाला येथे विचारले देखील नाही. चीनने प्रयत्न केले असते, तर कदाचित संवाद भागीदारात पाकिस्तानचा समावेश होऊ शकला असता. पण क्युबा आणि बोलिव्हिया हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे देश मानले जातात पण पाकिस्तान नाही.
चीमा असेही म्हणाले की, जागतिक मुत्सद्देगिरीत पाकिस्तान खूप मागे पडलाय. आपण जगात आपल्या हस्तक्षेपाचा विचारही करत नाही. पाकिस्तानने आता अर्ज केलाय पण त्यावर पुढे काहीच झाले नाही. आपल्याला एवढा वेळ का लागला, हे युंगजा सरकारला माहीत होते. याची जाणीव पाकिस्तान सरकारला का नव्हती? चीमा यांनी विचारले की, आमचे राजकारणी कोणत्या जगात आहेत? ब्रिक्स ही छोटी गोष्ट नाही हे त्यांना कळत नाही का.
मोदी-जिनपिंग भेट
ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीबाबत कमर चीमा म्हणाले की, ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती. चीन आणि भारताला हे माहित आहे की, प्रदेशातील शांततेसाठी दोघांमध्ये शांतता असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांनी संवादाचा मार्ग खुला करून सीमाप्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलली आहेत. चीन आणि भारताने दोघांनाही जागा दिली आहे जेणेकरून बोलण्यासाठी चांगले वातावरण तयार होईल आणि गोष्टी चांगल्या दिशेने जातील.