धार्मिक

दिवस-रात्र देवाच्या भक्तीत मग्न असायची 12 वर्षांची मुलगी, अचानक घडलं असं काही..


बारावा वर्षांच्या अल्लड वयात मुलं अभ्यास, मित्रांबरोबर खेळणं-बागडणं, मोबाईलवर गेम खेळणं किंवा टीव्हीवर कार्टुन बघण्यात वेळ घालवतात. पण बारा वर्षांची खुशी यापैकी काहीच करत नव्हती.

 

तिचा दिवसातला बराच वेळ पूजा-पाठ (Devotee) करण्यातच जात असे. घरच्यांना तिच्या देवभक्तीवर कोणताच आक्षे नव्हता. पण ही सवय एक दिवस कुटुंबाला अडचणीत टाकेल याची घरच्यांना कसलीही कल्पना नव्हती. राजस्थानमधल्या झालावाड (Jhalawar) इथल्या या घटनेची संपूर्ण राज्यात चर्चा आहे.

 

काय घडलं नेमकं?
झालावाडमधल्या झालरपाटन भागात राहाणाऱ्या एका कुटुंबाने आपली बारा वर्षांची मुलगी घरातून गायब झाली. याची तक्रार कुटुंबियांनी पोलीस स्थानकात केली आहे. कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुलगी खुशी दिवसभार देवाच्या पुजेत मग्न असायची. घरच्यांना आणि शेजारच्यांनाही तिच्या देवभक्तीचं कौतुक वाटायचं. पण त्यांना आपली मुलगी इतं मोठं पाऊल उचलेल याची जराही कल्पना नव्हती. एकेदिवशी घरच्यांचा नकळत देवाच्या शोधात ही मुलगी घरातून निघून गेली.

 

घर सोडताना लिहिली चिठ्ठी
खुशीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी खुशीने उपवास ठेवला होता. खुशीची आई नोकरी करते. सकाळी नोकरीवर जाताना देवघरातल्या असलेल्या खुशीला सांगून आई घराबाहेर पडली. पण ज्यावेळी संध्याकाळी तिची आई घरी आली तेव्हा तिला खुशी घरात कुठेच दिसली नाही. तिच्या आईने शेजारच्यांना खुशीबद्दल विचारलं, पण कोणलाच तिच्याबद्दल माहित नव्हतं. शेवटी खुशीच्या खोलीतून एक चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी वाचून आईच्या पायाखालची जमीन सरकली. यात खुशीने आपण घर सोडून भक्तीमार्गावर जात असल्याचं सांगत सन्यास घेणार असल्याचं लिहिलं होतं.

 

घरातून सामान घेतलं
या चिठ्ठीत खुशीने घरातून आपण एक हजार रुपये आणि काही कपडे घेतल्याचंही लिहिलं होतं. मथुरेच्या दिशेने जात असून पुन्हा घरी परतणार नसल्याचा उल्लेखही तीने केला होता. चिठ्ठी मिळताच हादरलेल्या कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्थानक गाठलं. खुशीचं देवप्रेम माहित होतं, पण ती इतकं मोठं पाऊल उचलेल याची जराही कल्पना नसल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय.

 

कुटुंबियांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी काही पथकं तयार केली असून खुशीच्या शोधासाठी पाठवण्यात आली आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button