ताज्या बातम्या

एकनाथ शिंदेंविरोधात मनसेचा हुकमी एक्का? राज ठाकरे यांनी केले उमेदवाराचे नाव घोषित


महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचवेळी विविध राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. यंदाच्या निवडणुकीत त्रिरंगी, चौरंगी लढत होणार आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीची लढत होत असताना राज ठाकरे यांचा मनसे पक्षही पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उमेदवार देण्याची घोषणा केली होती. आता सोमवारी डोंबिवलीत आल्यावर राज ठाकरे यांनी दोन नावे जाहीर केली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गडात मनसेचा हुकमी एक्का म्हणून समजले जाणारे अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी येथून निवडणूक लढवतात. त्यावेळी मनसे ठाण्यातील उमेदवार म्हणून अविनाश जाधव यांचे नाव जाहीर केले. आता अविनाश जाधव ठाण्यातील कोणत्या मतदार संघात उभे राहणार ते मनसेची यादी आल्यावरच स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले राज ठाकरे

डोंबिवलीत बोलताना राज ठाकरे म्हणाले, मनसेची दुसरी यादी लवकरच जाहीर होईल. यादीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. परंतु आज मी आलोच आहे तर राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करत आहे. तसेच येत्या २४ तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा फार्म भरण्यासाठी मी येणार आहे. मला आठ वाजता मुंबईत पोहचायचे आहे, त्यामुळे मी आता जास्त काही बोलणार नाही.

एकमेव आमदार राजू पाटील यांना पुन्हा उमेदवारी

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार विजयी झाले होते. कल्याण ग्रामीण मतदार संघातून राजू पाटील यांना विजय मिळाला होता. त्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. आगरीबहुल असा हा मतदारसंघ आहे. आता या ठिकाणी पुन्हा आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील विजयी होणार का? याकडे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button