मराठवाड्यात भाजपचे 16 उमेदवार घोषित
मराठवाड्यातील 16 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एका ठिकाणी मात्र भाजपने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. गेल्यावेळी भाजपने मराठवाड्यात 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते.
यंदा भोकरमधून अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आल्याने एकूण 17 ठिकाणी भाजप मराठवाड्यात उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यात बीड जिल्ह्यातील गेवराई येथील उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही.
गेल्यावेळी येथून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने या ठिकाणी भाजपकडून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मराठवाड्यातील भाजप उमेदवार
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
किनवट – भीमराव केराम
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड
हिंगोली – तानाजी मुटकुळे
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबन लोणीकर
बदनापूर – नारायण कुचे
भोकरदन – संतोष दानवे
केज – नमिता मुंदडा
निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर- राणा जगजितसिंह पाटील
भोकर – श्रीजया चव्हाण
गेवराई- अद्याप घोषित नाही