ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २०२४ साठी समता पार्टीच्या प्रतिज्ञानाम्यातील प्रमुख मुद्दे


प्रतिज्ञानामा

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २०२४ साठी समता पार्टीच्या प्रतिज्ञानाम्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे:

• मराठा समाजास “काकासाहेब कालेलकर” समितीने दिलेले आरक्षण पुन्हा मिळवुन देणार.
• आरक्षणाची ५०% ची मर्यादा हटवुन सर्व जाती आणि समाजातील सर्व गरीब व अल्प उत्त्पन्न जनतेसाठी आरक्षण मिळवुन देणार.
• मुस्लिम समाजास नियमात बसणारे आरक्षण मिळवुन देणार.
• सर्व नॉन क्रीमिलियरची उत्त्पन्नाची मर्यादा रुपये ८ लाखांवरुन रुपये १२ लाख करणार.

• सर्व सरकारी तसेच निम्न सरकारी कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना महाराष्ट्रात लागु करणार.
• दुग्ध उत्पादन शेतकर्यांना रुपये ४२ इतका हमी भाव देणार.
• कापुस, हळद व सोयाबीन उत्पादन शेतकर्यांना जास्तीत जास्त हमी भाव देणार.
• सर्व शेतकर्यांच्या शेतमालांस हमी भाव मिळवुन देणार.
• पोलिस भरती तात्काळ सुरू करुन पोलिस कर्मचार्यांना पुर्ण पाठबळ देणार.

• पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्यावरील कर ५०% पर्यत कमी करणार व महागाई कमी करण्याचा प्रयत्न करणार.
• लाडकी बहिण योजनेची मर्यादा प्रति महा रुपये १,५००/- वरुन प्रति महा रुपये ३,०००/- करणार व कुटुंबाच्या उत्त्पन्नाची मर्यादा रुपये २,५०,०००/- वरुन रुपये ५,००,०००/- करणार.
• महाराष्ट्रातील बहिणींवर होणारे अत्याचार,बलात्कार,विनयभंग थांबवण्यासाठी तात्काळ कठोर शिक्षेची तरतुद करुन “जन्मठेप किंवा फाशी”देण्यासाठी कायदा आणण्याचा प्रयत्न करणार.

• सरकारी सेवांमध्ये सुधारणा करणार.
• सर्व गडकिल्ल्यांवरील अनाधिकृत बांधकाम तात्काळ नष्ट करण्यात येईल. तसेच सर्व गडकिल्ल्याचे तपासणी करुन सुशोभीकरण करण्यात येईल.
• पदवी पर्यंतचे शिक्षण सर्व सरकारी व खाजगी शाळा व कॉलेज मध्ये मोफत देण्यात येईल.

• महाराष्ट्रात सर्व खाजगी वाहनांना सरसकट टोल माफी करणार.
• रस्ते निर्मीती कायद्यात बदल करून महाराष्ट्र खड्डे मुक्त करणार.
• मुंबई–गोवा महामार्ग एकावर्षात पुर्ण करणार.
• खाद्य पदार्थ्यांवरील जीएसटी माफ करणार.
• जलद न्यायांसाठी कायदे यंत्रणेत सुधार करणार.
• वयोवृध्द नागरिकांना “जॉर्ज फर्नांडीस सन्मान निधी” अंतर्गत प्र्ति महा रुपये ५,०००/- देण्यात येईल.

• गंभीर आजारांसाठी सर्व गरीब व मध्यंम वर्ग़ीय नागरिकांना रुपये ५ लाखांपर्यत उपचार मोफत देण्यात येणार.
• वाहन चालक कायद्यात सुधारणा करणार.
• भ्र्ष्टाचार निर्मुलन कायदा सुधारणार.
• “लाडका कंट्राटदार योजना” पुर्णपणे बंद करुन दोषी कंट्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
• जातिय तेढ सोडवण्यासाठी विशेष जलद गती न्यायालये निर्माण करुन जनतेचा न्यायप्र्णाली वरील विश्वास संपादन करणार.

• नियमित कर भरणा करणार्यांसाठी विशेष सवलत योजना राबवणार.
• ग्राहक संरक्षण कायदामध्ये सुधारणा करुन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार.
• प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिक उपाशी राहणार नाही याची काळजी घेणार.

• मालमत्तेवरील कर कमी करणार.
• “जॉर्ज फर्नांडीस -हर घर नल योजने” द्वारे सर्व नागरिकांना पुरेसे पाणी नळाद्वारे पुरवणार.
• प्रत्येक घरांस २०० युनिट वीज सोलरद्वारे मोफत देणार.
• प्रत्येक नागरीकांस सरकारी विमा कवच देणार.
• सर्व सण,उत्सव शांतते साजरे होण्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करुन पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करणार.
• शासकीय रुग्णालयांची निर्मिती करुन सर्व नागरिकांना मोफत उपचार देणार.
• ग्रामपंचायत कर्मचारी यांना नगर परिषद कर्मचारी स्वतंत्र दर्जा देऊन वेतन श्रेणी लागु करणार.

• भुमिहीन शेतमजुर यांना क्रांतीसिंह नाना पाटील सन्मान शेतकरी योजना राबवणार.
• ग्रामीण भागातील विद्यार्थयांना हुतात्मा वीर भाई कोतवाल शिष्यवृत्ती योजना लागु करणार.
• संत सेना केशशिल्पी महामंडळ पुनर्जीवित करुन निधी उपलब्ध करुन देणार.

• सर्व भ्रष्ट माजी मंत्री, नगरसेवक, सरपंच व दोषी अधिकार्यांवर कारवाई करुन त्यांच्या सर्व सोयीसुविधा बंद करण्याबाबत कायदा लागु करणे व जो “काळा पैसा” जमा होईल, तो सर्व महाराष्ट्रातील जनतेस देण्याबाबत नियम बनवणार.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button