राजकीय

हिंदुत्वासाठी भाजपाला समर्थन; डोंबिवलीतील २५० सार्वजनिक मंडळांचा निर्धार


राज्यात विधानसभेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. सर्व पक्ष आणि पक्षातील नेतेमंडळी आपल्या पक्षाचा पाठबळ वाढवण्यासाठी सभा घेत असताना दिसून येत आहेत. दरम्यान, डोंबिवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

या मेळाव्यात हिंदुत्वाचा जयघोष दुमदुमला आहे. डोंबिवलीच्या विविध सामाजिक संस्था तसेच सार्वजनिक मंडळांनी भाजपलाच सरकारी करणार असल्याचे जाहीर केले आहे.

येथील सामाजिक संस्था आणि सार्वजनिक मंडळांनी हिंदुत्वासाठी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित लोकांना आवाहन केले कि माझे हात बळकट करण्यासाठी मला साथ द्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर ‘रवींद्र चव्हाण आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या नाऱ्याने संत सावळाराम क्रीडा संकुल पेटून उठले. उपस्थित मंडळींनी जोरजोरात नारेबाजी करत मंत्री चव्हाणांना पाठिंबा जाहीर केला.

 

पुढे रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले कि,” भारताला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असून जगभरात भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी सगळ्यांची साथ महत्वाची आहे.” एकंदरीत, त्यांनी जनतेला भावनिक साद दिली आहे. त्यांच्या या सादीला शेकडो शेकडो मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला आहे. जवळजवळ २५० सार्वजनिक मंडळांनी समर्थन दर्शवले आहे.

भाजपच्या १४३ विधानसभा मतदारसंघाचीही रविवारी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते अशांचा मंत्री चव्हाण यांनी मेळावा घेतला, त्यालाही चार हजार कार्यकर्ते उपस्थित होते. संत सावळाराम क्रीडा संकुलामधील नमो रमो दांडिया रास उत्सवाच्या पेंडॉलमध्ये मेळावा संपन्न झाला. त्यावेळी जिल्हाद्यक्ष नाना सूर्यवंशी ,माजी नगरसेवक मंदार हळबे, राहुल दामले, शैलेश धात्रक, विकास म्हात्रे, खुशबू चौधरी, शशिकांत कांबळे, नंदू परब यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

निवडणूकीला कसे काम करावे, प्रचार प्रसार कसा करावा, मतदारांपर्यंत काय मुद्दे न्यावेत याबाबत मंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळीही उपस्थितांनी जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय च्या घोषणांनी सभामंडप दणाणून सोडला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button