राजकीय

ठरलं तरं! या दिवशी होणार विधानसभा निवडणुकांची घोषणा? शरद पवारांनी वार अन् तारीखही सांगितली!


Sharad Pawar : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. राज्यात कोणत्याची क्षणी निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने सर्व राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

या आठवडाभरात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. शुक्रवारी आचारसंहिता लागू होईल, असं ते म्हणालेत.

 

काय म्हणालेत शरद पवार?

भारतीय जनता पक्षाचे नेते, तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. चरण वाघमारे हे विधानसभा लढण्यास इच्छुक असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार राजू कारेमोरे यांच्या विरोधात त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. या कार्यक्रमावेळी बोलताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांवरुन महत्वाचे विधान केले तसेच यावेळी भाजपवरही जोरदार निशाणा साधला.

“भाजपचा जन्म होण्यापूर्वी जनसंघ महत्त्वाचा पक्ष होता. त्या जनसंघाची वाढ भंडारा गोंदिया जिल्ह्यातून झाली होती. अनेक राजकीय लोक तिथून निवडून येत होते. या जिल्ह्यात वेगळी विचारधरा होती सामान्य लोकांची प्रश्र्न मांडणारी होता. आजचा भाजप आणि आधीचा भाजप यात मोठा फरक होता. राज्यात मागच्या २ महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील ८० टक्के लोक हे भाजपमधून आहेत. अस का होत आहे तर त्याच कारण असं होतं की शिस्त राहिली नाही. असं भाजपचे एक नेते जे माझे मित्र आहेत ते सांगत होते,” असे शरद पवार म्हणाले.

 

दरम्यान, “आत्ताचे नेतृत्व पाहता आधी जी शिस्त होती ती आताच्या नेतृत्वाकडून पाहायला मिळत नाही त्यामुळे असं घडत आहे. शुक्रवारी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. राज्यात ३ पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढत आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन काम करत आहेत. आज १ वाजता पत्रकार परिषद आहे,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button