मोठी बातमी! बाबा सिद्दीकींची गोळी झाडून हत्या

Baba Siddiqui Death : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.
त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे.
माहितीनुसार, त्यांच्यावर तीन व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. 12 ऑक्टोबर (शनिवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला होता. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्यावर एसआरए प्रकल्पातून गोळीबार झाला आहे.
कोण आहेत बाबा सिद्धिकी?
-बाबा सिद्धिकी राजकारणातील बडा चेहरा
-काँग्रेस पक्षाकडून त्यांनी आमदारकी भूषवली आहे
-गेली अनेक दशके त्यांनी काँग्रेस पक्षात काम केले
-परंतु मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांनी दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला
-सिद्धिकी यांचा बॉलिवूडमध्येही मोठा दबदबा आहे
-त्यांच्या एका फोनवर अख्खे बॉलिवूड गोळा होता
-त्यांची इफ्तार पार्टी संपूर्ण बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे