आता खाऊन पिऊन आंदोलन करा; मनोज जरांगे यांना नारायण गडाच्या महतांचा आशीर्वादरूपी सल्ला!
बीड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी जो दसरा मेळाव्यांच्या धुमधडाका उडाला, त्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा नारायण गडावरचा मेळावा गाजला.
तिथे त्यांनी यंदा पहिल्यांदाच दसरा मेळावा घेतला हा अठरापगड जातींचा आणि बारा बलुतेदारांचा दसरा मेळावा असेल, असे सुरुवातीला मनोज जरांगे यांनी सांगितले होते, पण प्रत्यक्ष तो मराठा समाजाचा महामेळावा ठरला.
या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केले कचका दाखवून उलथापालथ घडवण्याची भाषा केली.
पण या मेळाव्यात नगद नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मनोज जरांगे यांना आशीर्वाद रुपी सल्ला दिला. इथून पुढे उपाशी राहून नाही, तर खाऊन पिऊन आंदोलन करायचे. नारायणगडाचा तुम्हाला आशीर्वाद आहे, असे महंत शिवाजी महाराज म्हणाले. मनोज जरांगे यांची गेल्या दीड वर्षात चार-पाच उपोषणे गाजली. या पार्श्वभूमीवर नारायण गडाच्या महान त्यांनी दिलेला आशीर्वाद रुपी सल्ला संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आला.
– 17 जातींच्या ओबीसी मध्ये समावेशाला विरोध
महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने 17 छोट्या – मोठ्या जात समूहांचा ओबीसीमध्ये समावेश केला. शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाने कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊन त्या निर्णयाच्या अंमलबजावणीची अधिसूचनाही काढली. पण मनोज जरांगे यांनी सरकारच्या या निर्णयावर शुभेच्छा 17 जातींना ओबीसींमध्ये घालताना तुम्ही महाविकास आघाडी कडून लिहून घेतले होते का??, मग फक्त मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला महाविकास आघाडी कडून लिहून घ्यायला का सांगता??, मराठे ओबीसींमध्ये आले, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो म्हणता, मग 17 जात समूह ओबीसींमध्ये घातले तेव्हा ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही का??, असा सवाल करून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले.
आचारसंहिता लागेपर्यंत या सरकारच्या निर्णयाची वाट पाहणार नंतरच भूमिका जाहीर करणार असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी आज नगद नारायण गडावरून मोठमोठ्या डरकाळ्या फोडल्या. त्यांच्या तोंडी कचका दाखवतो आणि उलथापालथीची भाषा आली. आम्ही मराठा क्षत्रिय आहोत. आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही कुणाचे ऐकत नसतो. आमच्यावर अन्याय होतो आहे. मला चहूबाजूंनी घेरले आहे, असे सांगून जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन मराठा समाजाला केले.
नगद नारायण गडावर बारा बलुतेदारांचा, सर्व अठरा पगड जातींचा दसरा मेळावा होईल, असे मनोज जरांगे यांनी सुरुवातीला जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांचे सगळे भाषण मराठा समाज केंद्रितच झाले. मराठा समाज कोणावर अन्याय करत नाही तो सगळ्या जाती जमातींना बरोबर घेऊन जातो, असे मनोज जरांगे म्हणाले.
आपल्या समाजाच्या नाकावर टिच्चून जर कुठली निर्णय होत असतील, समाजातल्या लेकरांवर कोणी अन्याय करत असेल, तर आपण गप्प बसायचे कारण नाही. आपल्या समुदायासाठी, आपल्या लेकरा बाळांसाठी यावेळी उलथापालथ करावीच लागेल. समाजाची शान वाढवण्यासाठी समोरच्याला गाडावाच लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
आपण कर्माने क्षत्रिय आहोत. माझ्या एका शब्दाची चूक झाली तर सगळ्या समाजाला सहन करावे लागेल म्हणून मी गप्प बसतोय पण आपण इथून हाणत हाणत निघालो, तर गुजरात हरियाणा पानिपत कटक पर्यंत हाणत जाणारा हा समाज आहे, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला.