‘वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय..’ दसऱ्याच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

Dussehra 2024 Wishes : हिंदू पंचागानुसार आश्विन महिन्याच्या शुल्क प्रतिपदेपासून ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दशमी तिथीला विजयादशमी साजरी केली जाते.
यंदा 12 ऑक्टोबरला म्हणजेच आज दसरा साजरा केला जात आहे.
मान्यतेनुसार या दिवशी प्रभू श्रीरामांंनी लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. तसेच तसेच दुर्गा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यानुसार वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतिक असलेला दसरा हा सण देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. दसऱ्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी प्रियजणांना पुढीलप्रमाणे खास मराठीत शुभेच्छा पाठवू शकता.
वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय
जल्लोषाचा विजय
साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त
सण हा आनंदाचा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🌹
सुख, समृद्धी, शांती
यशाच्या शुभेच्छांसह
तुम्हा आणि परिवाला दसऱ्याच्या शुभेच्छा🌹
आपट्याच्या पानांची
होते देवाण घेवाण
आपुलकी प्रेमाचा ओलावा करून दान
दिन आला सोनियाचा
भासे घरा ही सोनेरी
फुलो जीवन आपुले
येवो सोन्याची झळाळी
तुम्हा आणि परिवाला दसऱ्याच्या शुभेच्छा🌹
आपट्याची पाने
झेंडुची फुलेघेऊन आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख-समृद्धी लाभो
तुम्हा आणि परिवाला दसऱ्याच्या शुभेच्छा🌹
शुभ दसरा
वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर विजयाचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🌹
सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🌹
आंब्याच्या पानांची केली सजावट
अंगणात काढली रांगोळी छान
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🌹
तोरण बांधू दारी
रांगोळी काढू दारी
उधळण करू सोन्याची
नाती जपू मनांची
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
दसरा हे विजयाचे प्रतिक
असेच आपल्या जीवनात येणाऱ्या
प्रत्येक संकटावर आपण नेहमी विजय मिळवावा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
प्रभू श्री रामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अंहकाराचा नाश करत
दसरा करू साजरा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
सण हा विजयाचा
शुखर गाठू यशाचे
प्रगतीचे सोनं लूटू
सर्वांमध्ये हे वाटायचे
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
सोन्यासारख्या मित्रपरिवाला
सोन्यासारख्या लोकांना
दसऱ्याच्या सुवर्ण शुभेच्छा
तुमची आठवण म्हणून हा प्रयत्न
सोन्या सारखे तर तुम्ही आहात
सदौव सोन्यासारखे राहा
दसऱ्याच्या सर्वांना सुवर्ण शुभेच्छा
पहाट झाली दिवस उजाडला
आला आला सण दसऱ्याचा आला
अंगणी रांगोळ्या,दारी तोरण
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोन्यासारखे राहा
दसऱ्याच्या सर्वांना सुवर्ण शुभेच्छा