पाकिस्तानच्या झोळीत पडणार सात अब्ज डॉलर्स
Pakistan : आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या झोळीत सात अब्ज डॉलर्स पडणार असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या देशाला नवीन बेल आऊट पॅकेज मंजूर केला आहे.
सध्याची चणचण दूर करण्यासाठी यापैकी १.१ अब्ज डॉलर्स पाकिस्तानला तातडीने दिले जाणार आहे.
पाकिस्तानने आपला कृषिआयकर सुधरवण्याचे, काही आर्थिक जबाबदाèया प्रांतांवर टाकरण्याचे आणि अनुदानांवर मर्यादा घालण्याचे कबूल केल्यानंतर वॉqशग्टन येथे बुधवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीत कराराला मंजुरी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकाळी मंडळाने सात अब्ज डॉलर्सच्या ३७ महिन्यांच्या विस्तारित निधी सुविधेला मंजुरी दिली, असा दुजोरा पंतप्रधान कार्यालयाने दिला. या कर्जावर पाकिस्तान पाच टक्क्यांच्या दराने व्याज देणार आहे, असे वृत्त एक्सप्रेस ट्रिब्युन या वृत्तपत्राने पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयाच्या हवाल्याने दिले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची ही शेवटची मदत असेल, असा पुनरुच्चार पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी बुधवारी केला. असेच वक्तव्य त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२३ मध्ये मदत केल्यानंतर केले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या नवीन पॅकेजचे श्रेय त्यांनी उपपंतप्रधान इशाक डार, लष्करप्रमुख जनरल आसिम मुनिर आणि वित्तीय चमूला दिले.