पोलीस शिपायासोबत पळाली भाजपा नेत्याची पत्नी, सोबत मुलगा आणि कोट्यवधी रुपयेही नेले
उत्तर प्रदेशमधील भदोही येथे एका भाजपा नेत्याची पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेल्याची घटना घडली आहे. सदर महिलासुद्धा भाजपाची नेता असून, तिने निवडणूकही लढवलेली आहे. दरम्यान, ज्या तरुणासोबत ही महिला नेता पळून गेली आहे तो उत्तर प्रदेश पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे.
हा तरुण महिलेच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. या महिलेचं वय ४५ वर्षे आहे, तर तिचा प्रियकर असलेला हा तरुण ३० वर्षांचा आहे. आता महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत दोघांचाही शोध सुरू केला आहे.
दरम्यान, या महिलेच्या पतीने त्याची पत्नी घरातील अडीच कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच सदर पोलिस शिपायाने माझ्या पत्नीला फसवल्याचाही दावा केला आहे. तो म्हणाला की, माझी पत्नी ४५ वर्षांची आहे. तर सदर शिपाई हा ३० वर्षांचा आहे. दोघेही परस्परविरोधी आहेत. मात्र केवळ पैशांसाठी हा पोलीस शिपाई माझ्या पत्नीला घेऊन फरार झाला आहे. तो तिची हत्याही करू शकतो.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गोपीगंज येथे राहणाऱ्या एका भाजपा नेत्याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितले की, एक वर्षांपूर्वी गोंडा येथील असलेला विनय तिवारी उर्फ राज तिवारी आमच्या घरात भाडेकरू म्हणून राहायला आला. मात्र त्याचं माझ्या पत्नीसोबत कधी लफडं सुरू झालं याची आम्हाला कल्पनाही आली नाही. या पोलीस शिपायाने मोठ्या चलाखीने माझ्या पत्नीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. माझ्या पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो काढून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. तसेच कुणाला सांगितल्यास सर्वांना अडकवण्याची धमकी दिली.
सदर महिलेचा पती असलेल्या भाजपा नेत्याने पुढे सांगितले की, जेव्हा मला या प्रकाराची माहिती मिळाली तेव्हा मी त्याला घरातून बाहेर काढले. तसेच मी माझ्या पत्नीलाही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्यामध्ये काही बदल झाला नाही. या पोलीस शिपायाला घरातून बाहेर काढल्यानंतर तो आमच्याविरोधात सूड उगवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामधूनच २८ ऑगस्ट रोजी त्याने माझ्या पत्नीला फूस लावली आणि तीही त्याच्यासोबत पळून गेली. त्यावेळी घरी कुणी नव्हतं. त्चाया फादा घेत घऱातून कोट्यवधीचे दागिने, रोख रक्कम आणि ७ वर्षांच्या मुलग्यालाही घेऊन गेली, असा दावा या महिलेच्या पतीने केला.
त्याने पुढे सांगितले की, मी या दोघांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यांची काहीच माहिती हाती लागली नाही. दरम्यान, या प्रकरणात काही स्थानिक लोकही गुंतलेले आहेत. तसेच विनय तिवार हा भाड्याच्या घरात राहायचा तेव्हाही घरी काही चुकीची कामं करताना पकडला गेला होता. त्याची सूचना आम्ही पोलिसांना दिली होती. त्यानंतर त्याला घराबाहेर काढले होते, असेही त्यांनी सांगितले.