Pakistan: पाकिस्तानमध्ये दर दोन तासांत एक महिला ठरते बलात्काराची शिकार, धक्कादायक अहवाल समोर
इतर मुस्लिम देशांप्रमाणेच पाकिस्तानमध्येही (Pakistan) महिलांची स्थिती अत्यंत वाईट आहे. पाकिस्तानमध्ये बलात्काराच्या बहुतांश घटनांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा समावेश असतो, अशी धक्कादायक माहिती पाकिस्तानी महिला खासदाराने नॅशनल टेलिव्हिजनवर धक्कादायक खुलासा करताना सांगितले.
व्हिडिओ👇👇👇👇
https://x.com/beed_news/status/1838631613313552529?t=6-wUx8cwaSJfSsU3dS8Brg&s=09
दर 2 तासांनी एका महिलेवर बलात्कार
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला खासदार शंदना गुलजार खान या अँकर हमीद मीर यांच्या टीव्ही शोमध्ये बोलताना म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये (Pakistan) बलात्कार करणाऱ्यांपैकी 82 टक्के गुन्हेगार हे पीडितेचे वडील, भाऊ, काका, मामा, आजोबा असतात. मुलींवर बलात्कार करणारे बहुतेक लोक कुटुंबातील आहेत. ज्या मुली वडिलामुळे घरी गर्भवती राहतात तिला तिची माता डॉक्टरकडे नेते आणि तिचा गर्भपात करून घेते, डॉक्टर जेव्हा तिला पोलीस ठाण्यात जाण्यास सांगतात तेव्हा त्या मुलीची माता म्हणते, मी माझ्या नवऱ्याला सोडू शकत नाही, अशी अवस्था आहे, असेही शंदना खान म्हणाल्या.
पाकिस्तानातील (Pakistan) लोक या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. ऑक्टोबर 2022 च्या सर्वेक्षण अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये दर 2 तासांनी एक महिला बलात्काराची शिकार होते. याशिवाय ऑनर किलिंगच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. पाकिस्तानमध्ये दर 12 महिलांवर बलात्कार होत असल्याचेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. हा आकडा कमी आहे कारण बहुतेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत, असेही शंदना खान म्हणाल्या.