मिस्टर जरांगे, तुम्ही मराठ्यांचं वाटोळं करु नका, लक्ष्मण हाके म्हणाले एका टक्क्यात., ओबीसी नेत्यांनाही सोडलं नाही

अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीत मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलनाने वातावरण तापलेले आहे. दुसरीकडे पंढरपूर येथे धनगर समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्य ढवळून निघाले आहे.
आज दुपारी अचानक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. उपोषण सोडण्यासाठी महिलांसह इतर आंदोलकांनी आग्रही मागणी केली. दरम्यान, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीराजे आणि जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
कोण राजरत्न? मी त्यांना ओळखत नाही
वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आज सहावा दिवस आहे. एकही अधिकारी इकडे फिरकला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मी राजरत्न आंबेडकर यांना ओळखत नाही. आम्ही प्रकाश आंबेडकर , आठवले यांना ओळखतो, असा चिमटा त्यांनी काढला. राजरत्न आंबेडकर यांनी चर्चेला यावे, ते कोण आहेत, कुठे राहतात याची माहिती द्यावी. राजरत्न यांनी आंबेडकर नाव लावू नये, असे आवाहन त्यांनी केले.
संभाजी राजे छत्रपती यांना एकरी भाषेत बोललो नाही फक्त मी मिस्टर संभाजी भोसले म्हणालो. स्वराज्य संघटना आम्हाला काय गोळ्या घालणार आहेत का. मी तिथेच आहात आम्ही कुठेही फिरतो त्यांनी यावा आम्हाला गोळ्या घालावा. अंतरवाली सराटीचा रस्ता आम्ही अडवला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अडवला आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्र्याला बोलावं, असे ते म्हणाले.
एका टक्क्यात काय काय घेणार?
मिस्टर जरांगे तुम्ही ओबीसी मध्ये येऊन एक टक्क्यात काय काय घेणार आहात? मराठ्यांचे वाटोळे करू नका, अशी टीका त्यांनी केली. निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार यांना मुद्दा उरलेला नाही हे त्यांचे अपयश आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे हे मुद्दे उरले नाहीत. म्हणून जाती जातीत असे मुद्दे उतरून लोकात भ्रम तयार करत आहेत. धनगर आरक्षण डिक्लेअर करा आणि मग आम्ही ओबीसीच्या आरक्षणाबद्दल निर्णय घेऊ. जरांगे आणि शरद पवार तुम्ही तयारी आहे का? असा सवाल त्यांनी केला.
ओबीसी नेत्यांवर टीका
मराठ्यांनी मराठ्यांसाठी चालवलेले राज्य या राज्यात ओबीसीला इज्जत नाही. ओबीसीला धक्का कसा लागणार नाही एकदा सरकारने आम्हाला सांगावं चर्चा करायला आम्ही तयार आहोत. राजरत्न तुला आमदार व्हायचं का? तू का शरद पवारांचा माणूस आहेस का? मी राज रतनला मानत नाही. तू कोण आहेस मला माहित नाही. ओबीसी नेत्यांनो आता तरी ये क्या आपल्या मताची ताकद मराठ्यांना दिसू द्या. अन्यथा हे लोक तुम्हाला सळोकीपोळ करून सोडतील, असे हाके म्हणाले. साध्य निवडणूक जवळ आल्याने सगळे नेते त्याच्या दबावाला बळी पडले की काय ?त्यामुळे ओबीसी नेते इथे आले तरी ठीक नाही आले तरी ठीक,ओबीसींचे नेते त्यांच्या दबावाला बळी पडले असतील, अशी टीका नवनाथ वाघमारे यांनी केली.