गर्भाशय काढून टाकल्यानंतर महिला सामान्यपणे जीवन जगू शकतात का? भविष्यात कोणत्या गंभीर समस्या येतात?
ताण-तणाव आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. यामध्ये महिलांना गर्भाशयाच्या समस्या तसंच वंध्यत्वाचाही धोका असतो, असं समोर आलं आहे. महिलांमध्ये पाहिलं तर, गर्भाशय आणि अंडाशयासंबंधी समस्या जास्त असतात.
वाढता मानसिक ताण, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, हार्मोनल असंतुलन यांसारख्या समस्या महिलांमध्ये अधिक दिसून येतो. त्यामुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या समस्यांचा धोका वाढू लागलाय. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स आणि अगदी गर्भाशयाचा कॅन्सर यांसारखे गंभीर आजार आजकाल सामान्य झाले.
परिणामी या आजारांमुळे महिलांना गर्भाशयाची शस्त्रक्रिया ज्यामुळे अनेक वेळा महिलांना गर्भाशयाची शस्त्रक्रिया करावी लागते. यामध्ये काही महिलांना गर्भाशय काढण्याचा देखील सल्ला दिला जातो. गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेपूर्वी स्त्रीच्या मनात बरेच प्रश्न घर करतात. यामधील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गर्भाशय काढल्यानंतर म्हणजेच हिस्टेरेक्टॉमी नंतर महिलांना कोणत्या समस्या येतात किंवा ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर सामन्य जीवन जगता येऊ शकतं का?
हिस्टेरेक्टॉमी नंतर सामान्य जीवन जगणे शक्य आहे का?
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पुजा माधव यांनी माहिती दिली की, रजोनिवृत्तीनंतर गर्भायश काढलं की नाही यावरून कोणत्या समस्या होतात हे अवलंबून असतं. हिस्टेरेक्टॉमीनंतर ओटीपोटाची कार्ये बदलू शकतात. विशेषतः जर रजोनिवृत्तीपूर्वी गर्भायश काढून टाकलं गेलं तर आरोग्याशी संबंधी काही समस्या उद्भवू शकतात. साधारणतः ४० ते ५० वर्षावरील अनेक महिलांना काही समस्यांमुळे गर्भाशय काढण्याचा सल्ला डॉक्टर येतात.
गर्भाशय काढून टाकण्यामागील कारणं?
गर्भाशय काढून टाकण्यामागील अनेक कारण असतात. जसं की, गर्भाशयात फ्रॉयबॉईड, एंडोमेट्रोसिस, पेल्विकमध्ये वेदना किंवा कॅन्सर ही यामागील कारण असू शकतात. गर्भाशय हा महिलेच्या शरीरातील एक भाग असतो. जर महिलांच्या शरीरातील एक भाग काढून टाकला तर काही ना काही समस्या उद्भवणार. यासाठी शस्त्रक्रियेनंतर आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कारण हिस्टेरेक्टोमी शस्त्रक्रियेनंतर गर्भाशय काढून टाकलं तर मासिक पाळी आणि गर्भधारणा होऊ शकत नाही. याशिवाय काही महिलांमध्ये मूड स्विंगची समस्या दिसून येते, असंही डॉ. पुजा यांनी सांगितलं आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोटात गर्भाशय नसल्याने पेल्विक कार्यामध्ये बदल होतो. यामुळे मूत्रमार्गात असंयम किंवा व्हॉल्ट प्रोलॅप्स (योनील प्रोलॅप्स) सारख्या समस्या उद्भवू शकतात. हिस्टेरेक्टॉमी शस्त्रक्रियेनंतर काही महिलांमध्ये रक्तस्त्राव होण्याची समस्या दिसून येऊ शकते. अशावेळी वेळीच स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
संतुलित आहार, कॅल्शियम सप्लिमेंट्स, नियमित व्यायाम आणि निरोगी वजन राखून संभाव्य समस्या टाळता येऊ शकतात. या शस्त्रक्रियेनंतर नियमित व्यायाम खूप फायदेशीर ठरू शकतो. अशाप्रकारे शस्त्रक्रियेनंतर आरोग्याची काळजी घेतल्यानंतर महिला निरोगी आयुष्य जगू शकतात, असं डॉ. पुजा यांनी म्हटलं आहे.