अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून (दि.२३) सायंकाळी एन्काउंटर झाला. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अक्षय शिंदे याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली.
या प्रकरणाबाबत बोलताना गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराची तकार दाखल केली होती. त्या संदर्भात चौकशी करण्याकरता तळोजा कारागृहातून त्याला वारंट घेऊन बदलापूरकडे नेण्यात येत होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक घेऊन फायर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी स्वता : च्या बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.