Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! ‘लाडक्या बहिणीं’च्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली, ‘या’ दिवशी खात्यात पैसे जमा होणार
Ladki Bahin Yojana : आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिलांमध्ये खूपच प्रसिद्ध झाली आहे.
या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच 3000 हजार रुपये जमा केले आहेत.
मात्र सप्टेंबर महिना संपत आला तरी अद्याप तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही. यातच अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की, तिसऱ्या महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार. याचेच उत्तर आता मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे.
तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी होणार जमा?
तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात कधी येणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचबद्दल माहिती देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की, ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबरमध्ये रायगड येथे होत आहे. २९ तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. यावेळी सप्टेंबरपर्यंत आलेले अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील. पडताळणीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही, त्यांचे सर्व लाभ दिले जातील. २ कोटी महिलांना लाभ दिले जातील”
दरम्यान, याआधी जुलै महिन्यात पहिला हप्ता आणि ऑगस्ट महिन्यात दुसरा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आला आहे. यातच ज्या महिलांनी जुलै महिन्यात या योजेनसाठी अर्ज केला त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात एकदम दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच 3000 रुपये जमा करण्यात आले.
ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात किती येणार पैसे?
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्टपर्यंत होती. मात्र नंतर राज्य सरकारने याच्या नोंदणीची तारीख पुढे वाढवत ती 30 सप्टेंबरपर्यंत केली. यातच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या योजेनसाठी नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात एकदम ती हप्त्याचे पैसे म्हणजेच 4500 रुपये येऊ शकता, असं बोललं जात आहे.