राजकीय

Ajit Pawar : येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे वीज ‘Zero Bill’ करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार


महायुतीत सामील झाल्यानंतर अनेकांनी आमच्यावर टीका केली, परंतु आम्ही विकासासाठी सरकारमध्ये गेलो. सत्ता असेल तरच सर्वसामान्यांची कामे होतात. लाडक्या बहिणी सक्षम करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

 

भविष्यात कोणाच्याही एकट्याचे सरकार येणार नाही. केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या.

त्यांना कांदा निर्यात बंदी उठवीण्याची विनंती केली तर सोयाबीन व कापसाला वाढीव दर देण्याचीही विनंती केली. आता साखरेची एमएसपी वाढविण्याची मागणी केली आहे त्याशिवाय ऊसाला दर देता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 

रविवार 22 रोजी मोहोळ येथे उपमुख्यमंत्री पवार यांची जन सन्मान यात्रा आली होती त्यावेळी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, येत्या वर्षभरात शेतकऱ्यांना दिवसा विज दिली जाणार आहे तर, राज्यातील अनेक उपसा सिंचन योजना या वीज बिलाअभावी बंद पडतात. त्यासाठी त्या सर्व योजनांना सोलर खाली घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. महायुती ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. शेतकऱ्यांचे मागील व पुढील सर्वच वीज बिल झिरो करणार आहोत.

 

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्याने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जादा जागा निवडून येतील. सत्ता असो किंवा नसो सर्वसामान्यां साठी काम करणारे नेते म्हणजे राजन पाटील आहेत. परंतु आम्ही त्यांना न्याय द्यायला कमी पडलो. मात्र त्यांना योग्य सन्मान देण्याचे काम आम्ही करू.

यावेळी आमदार यशवंत माने म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांच्या मुळेच मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी मिळाला. 2024 ला आपण दिलेला उमेदवार चांगल्या मताने निवडून येईल. दरम्यान आमदार माने यांनी राजन पाटील व माझ्यावर खालच्या पातळीत टीका केली जाते हे थांबणे गरजेचे आहे. अशी तक्रार त्यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे उमेश पाटलांचे नाव न घेता केली.

 

प्रास्ताविक करताना लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सीना भोगावती जोड कालवा, सीना भीमा नदीवर बॅरेज बंधारे व अनगर व दहा गावे पाणीपुरवठा योजना या आचारसंहिता लागण्या अगोदर मंजूर कराव्यात अशी मागणी केली.

मोहोळ तालुक्यात केवळ दोनच पक्ष आहेत एक म्हणजे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी सर्वसामान्य जनता व दुसरा म्हणजे चोरून सभा ऐकणारा. येत्या 2024 चे मुख्यमंत्री हे अजित पवार असतील तर, मोहोळचा आमदार हा राष्ट्रवादीचाच असेल.

 

यावेळी माजी आमदार राजन पाटील महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे कल्याणराव काळे कल्याणराव पाटील अजिंक्यराणा पाटील यांच्यासह प्रकाश चौरे दीपक माळी चंद्रहार चव्हाण हेमंत गरड कुंदन धोत्रे माऊली चव्हाण यशोदा कांबळे माऊली जाधव मदन पाटील यांच्यासह तालुक्याच्या विविध भागातील सरपंच उपसरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

मोहोळला भविष्यात निधी कमी पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री पवार

महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा- उपमुख्यमंत्री अजित पवार

राजन पाटलांचा योग्य सन्मान करू- प्रदेशाध्यक्ष तटकरे

येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांची मागची व पुढची विज बिले झिरो करू- उपमुख्यमंत्री पवार

येत्या 2024 चे मुख्यमंत्री अजित पवारच- विक्रांत पाटील

माझ्यावर व माजी आमदार पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली जाते ते थांबले पाहिजे- आमदार यशवंत माने.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button