PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान मोदींनी गाजवला अमेरिकेतला मेगा शो, USA निवडणुकीबद्दल म्हणाले..
न्यूयॉर्क : ‘आता आपलं ‘नमस्ते’ हे मल्टीनॅशनल झालं आहे. लोकल ते ग्लोबल झालं आहे आणि हे सर्व तुम्ही केलं आहे. भारताला हृदयात ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयांनी हे केलं आहे’ असं म्हणत अमेरिकेच्या भूमीवर पंतप्रधान मोदींनी भारतीयांशी खास हिंदीतून संवाद साधला.
पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी स्थायिक भारतीयांनी एकच गर्दी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी न्यूयॉर्कमधील नासाऊ कोलिझियम इथं भारतीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘भारत माता की जय’ चा जयघोष करत अमेरिकेतील स्थायिक भारतीयांची मनं जिंकली.
‘माझ्याकडे कोणतंही पद नसताना मी अमेरिकेतील जवळपास २९ राज्यांना भेटी दिल्या होत्या. मी कोणतंही सरकारी पद भूषवलं नाही, पण मला तुमची आपुलकी समजली, आताही समजते. मी मुख्यमंत्री झालो, तेव्हाही टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान झालोय, मला तुमच्याकडून अपार प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे. तुम्ही माझ्यासाठी नेहमीच भारताचे ब्रँड ॲम्बेसेडर आहात. मी तुम्हा सर्वांना राष्ट्रीय राजदूत म्हणतो. तुम्ही अमेरिकेला भारताशी आणि भारताला अमेरिकेशी जोडलं आहे. तुम्ही सात समुद्र ओलांडले आहेत, पण कोणताही समुद्र इतका खोल नाही की तो भारत मातेला तुमच्या हृदयाच्या खोलीतून काढून टाकू शकेल’ असं म पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
‘भाषा अनेक आहेत पण भावना एक आहे आणि ती भावना आहे भारतीयत्व. जगाशी जोडलं जाण्याची हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. त्याग करणारेच आनंद घेऊ शकतात. आपण कोणत्याही देशात राहत असलो तरी ही भावना बदलत नाही. आम्ही जिथे जातो तिथे सर्वांना कुटुंब समजतो आणि त्यांच्यात मिसळतो. कुणी तामिळ बोलतो. कुणी तेलुगु, कोणी मल्याळम, कोणी कन्नड, कुणी पंजाबी, कुणी मराठी, कुणी गुजराती, अनेक भाषा आहेत, पण भावना एक आहे आणि ती भावना आहे- भारतीयत्व, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितींची मनं जिंकली.
‘एआय म्हणजे अमेरिकन भारतीय. ही जगातील नवीन AI शक्ती आहे. मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. मी जगात कुठेही गेलो तरी प्रत्येक नेत्याकडून मला भारतीयांची स्तुती ऐकायला मिळते. हा सन्मान तुमचा आहे, तो 140 कोटी भारतीयांचा आहे, इथं राहणाऱ्या लाखो भारतीयांचा आहे’ असंही मोदी म्हणाले.
‘मी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आभार मानतो आणि तुमचेही आभार मानतो. भारत आणि अमेरिका लोकशाहीच्या उत्सवात एकत्र आहेत. अमेरिकेत निवडणुका होणार आहेत आणि त्या आधीच भारतात झाल्या आहेत. या निवडणुका भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या निवडणुका होत्या. संपूर्ण युरोपच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार भारतात मतदान करतात’ असंही मोदी म्हणाले.
https://x.com/narendramodi/status/1837891845273100309?t=k_cWiB-JESVEOtC8OAJ3Hw&s=19