मराठा आरक्षणराजकीय

Sharad Pawar : जरांगेंचे आंदोलन पेटले, ओबीसीही भडकले; राष्ट्रवादीवर संशयाची सुई; पवार आता म्हणतात ..


महाराष्ट्रात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन पेटले त्यानंतर ओबीसीही भडकले. गावागावांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र झाला. मराठा आरक्षण आंदोलकांनी शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांना सोडून बाकी सगळे नेत्यांवर सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.

मराठा आरक्षण आंदोलनाचा राजकीय लाभ पवारांच्या पक्षाला मिळाला. आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांचे मनोज जरांगेंशी असलेले छुपे संबंध उघड्यावर आले. त्यामुळे संशयाची सगळी सुई राष्ट्रवादीकडे फिरली. पण आता मात्र शरद पवारांनी महाराष्ट्रात तणाव नको, अशी भूमिका घेतली. sharad pawar

 

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा होत असल्याचे चित्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात वडीगोद्री येथे ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत, तर बाजूलाच आंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सहाव्यांदा उपोषण करत आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आगपाखड केली. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, जालनासह काही जिल्ह्यांत बंद पाळण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सामंजस्याने यातून मार्ग काढला पाहिजे, असे सांगितले. sharad pawar

 

शरद पवार पुढे म्हणाले, “तणाव निर्माण होण्याचे काहीही कारण नाही. कारण आपला जात, धर्म वेगळा असला तरी आपण सर्व भारतीय आहोत. महाराष्ट्राचा आपण सर्व घटक आहोत. सर्व समाजात सामंज्यस्य कसे राहिल, याबाबतची भूमिका या विषयात जे काम करत आहेत, त्यांनी घेतली पाहीजे. राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांवर निर्णय घेताना लोकांना सामील करून घेतले पाहीजे. तसेच वातावरण चांगले कसे राहिल, याचीही खबरदारी घेतली गेली पाहिजे. sharad pawar

 

पण आज वातावरण चांगले ठेवण्यासाठी सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असे म्हणणाऱ्या शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला हजेरी लावली नव्हती. उलट बाकीच्या पक्षांचे नेते त्या बैठकीला जाणार होते, तेव्हा “सिल्वर ओक” मधून फोन गेला आणि बाकीच्या पक्षांचेही नेते सर्वपक्षीय बैठकी बाहेरच राहिले, असे त्यावेळी बोलले गेले, पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण होताच पवारांनी आपली भूमिका बदलून महाराष्ट्रात तणाव नको असे सांगायला सुरुवात केली आहे. sharad pawar

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button