Manoj Jarange Patilताज्या बातम्या

जे काय करायचं ते शांततेने करा ! मराठा-ओबीसी आंदोलन पेटलं, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया काय?


राज्यात पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झालं आहे. तर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी आली आहे. याठिकाणी मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.



 

तर मंगेश ससाणे यांनी ओबीसी बचावासाठी उपोषण सुरू केले आहे. वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांनी आंदोलनचा पुकारा केला आहे. या सर्व प्रकारावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्वांनाच मोठा सल्ला दिला आहे. काय म्हणाले भुजबळ?

 

जे काय करायचं ते शांततेने करा

जालन्याच्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने उभे ठाकले आहेत. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी झाली आहे. पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, याविषयी भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचे उपोषणाला मी काय सांगणार. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपोषणाला बसताय मला फोन करतात मी बसतो. मी काय सांगू त्यांना. तसे त्यांनी सुरू केलं तर यांनी सुरू केलं. जे काय करायचं ते शांततेने करा. कायदा सुव्यवस्थेचा शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. लोकशाहीमध्ये अहिंसक आंदोलन करण्याची परवानगी आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

 

मराठा आंदोलक आणि शंभुराज देसाई यांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे यांनी रात्री सलाईनद्वारे उपचार घेतले, त्यावर भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. शंभूराज देसाईंची जरांगेंसोबत संवादाची माहिती सोमवारी देणार आहेत. ते काय माहिती देतील त्यावेळी पाहू. आता काय माहिती देतात मला काय माहिती, असे भुजबळ म्हणाले.

 

मी काय बोलणार त्यांनी आदेश दिले हे बंद करा ते बंद करा. धनगर समाजाचा सुद्धा अटीतटीवर आलय. पंढरपूर मध्ये ते आणखीन रस्त्यावर उतरतील. आपण काय बोलणार त्यावर. लोकांनी बंद पाळायचा तिने पाळायचा लोक ठरवतील. त्यांनी केल्यानंतर दुसरे लोक करतात का ते पण बघावे लागेल. मराठा समाजाला वेगळा आरक्षण आपण दिलेला आहे. त्या आरक्षणा नुसार आता कामगार भरती असेल शिक्षणामध्ये असेल ते आरक्षण लागू झालेला आहे त्याचा फायदा समाजाचे लोक घेतायेत आम्हाला सुद्धा आनंद आहे. रोज नवीन नवीन तुम्ही काढाल तर समोरचे लोकही गप्प बसत नाही, असे उत्तर भुजबळांनी दिले.

 

अटीतटीवर येऊन कसं चालेल?

लोकांना अहिंसक आंदोलन, सत्याग्रह,अन्नत्याग हे आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आपण त्यांना ना करू शकत नाही. त्यातून जे आहे उद्रेक होणार नाही लोकांना त्रास होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. प्रश्न जे आहे ते बसून सोडावे लागतात. ज्या वेळेला प्रश्न सोडवले जातात प्रथा परंपरा कायदा काय आहे. कोर्टाचे नेम काय आहे. काय दिलंय काय मागणी आहे याचं विचार करूनच पुढे जाता येईल. एकदम असे अटीतटीवर येऊन चालणार नाही, असा टोला त्यांनी आंदोलनकर्त्यांना लगावला.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button