सासवड : नारायणपूरचे सद्गुरू नारायण महाराज अनंतात विलीन

आपले निम्म्याहून अधिक आयुष्य दत्तसेवेच्या माध्यमातून व्यतीत करून राज्यात-देशात आणि अगदी अलीकडेच अमेरिकेत या संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून लक्षावधी भाविकांच्या मनावर अधिराज्य असलेले सदगुरु नारायण अण्णा महाराज बोरकर अनंतात विलीन झाले.
त्यांचे शिष्य आणि इथून पुढचे उत्तराधिकारी पोपट महाराज टेंभे यांनी ४ वाजता अग्नी दिला.
यावेळी जिल्ह्यासह बाहेरून मोठ्या संख्येने भाविक महिला भक्त श्रद्धेने उपस्थित होते. यावेळी मोठा दत्त सांप्रदायिक शिष्यवर्ग, महिला येथील मुख्य व्यवस्थापक व कै अण्णामहाराजांचे विश्वासू सहकारी जेष्ठ मार्गदशक भरतनाना क्षीरसागर यांना आपले दुखाश्रु अनावर झाले. या वेळी वरुण राजानेही हजेरी लावली.
दरम्यान, जवळपास अर्धा दिवस भाविकांच्या दर्शनासाठी अण्णांचे पार्थिव मंदिर आवारात ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार, प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार भीमराव तापकीर, आदींसह अनेक मान्यवरांनी दुपारी भेट देत पार्थिवाचे दर्शन घेतले.
तर अंत्यविधीसाठी आमदार संजय जगताप, पुणे महापालिकेच्या नगरसेविका संगीता ठोसर, संभाजी झेंडे, जिल्हा सह. बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, भाजपचे विभागीय प्रांताध्यक्ष जालिंदर कामठे, आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार शरद ढमाले, माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी मान्यवर उपस्थित होते.