रशियन महिलेबरोबरची रात्र, 27 अश्लील Videos अन् 1 कोटींचा गंडा…
हनी ट्रॅप हा प्रकार तुम्ही यापूर्वी अनेकदा बातम्यांमधून ऐकला किंवा वाचला असेल. मादक महिलांशी मैत्री करण्याच्या बहाण्याने एखादी गुप्त माहिती महत्त्वाच्या व्यक्तीकडून काढून घेणे किंवा ब्लॅकमेल करुन आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने हनी ट्रॅपींग केलं जातं.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) या नामांकित सरकारी कपंनीमधील निवृत्त अधिकाऱ्याला लुटलं आहे. एका महिलेच्या नादाला लावून या अधिकाऱ्याला लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
27 व्हिडीओ…
मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे ही घटना घडली असून हनी ट्रॅप करणाऱ्या एका टौळीने या निवृत्त अधिकाऱ्याकडून मोठी रक्कम लुबाड्याचं उघड झालं आहे. रशियन महिलेशी भेट घालून देतो असं आमिष दाखवून या वयस्कर व्यक्तीला लुबाडण्यात आलं. एक रात्र या महिलेबरोबर राहिल्यानंतर या व्यक्तीच्या तिच्याबरोबरचे व्हिडीओ या लोकांनी लपून छपून काढले. या दोघांचे एकूण 27 अश्लील व्हिडीओ या टोळीने काढले. नंतर याच व्हिडीओंच्या माध्यमातून बदनामीची धमकी देत या व्यक्तीकडून खंडणी वसूल करण्यात आली.
पैसे दिले नाही तर…
पैसे दिले नाहीत तर हे व्हिडीओ सार्वजनिक करु अशी धमकी दिल्याने या व्यक्तीने नाइलाजास्तव या टोळीला 1 कोटी रुपये दिले. या व्यक्तीला या टोळीने महिलेबरोबर राहण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावलं. त्यानंतर लपून या व्यक्तीचे त्या महिलेबरोबरचे व्हिडीओ काढण्यात आले. याच व्हिडीओंच्या आधारे या व्यक्तीकडून पैसे उकळण्याचं काम या टोळीने सुरु केलं. याच टोळीतील एकाने आपण गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी असल्याचा दावा करत या व्यक्तीला अटकेची भीती घालत फसवणूक केली.
रशियन महिलाही फरार
वारंवार या टोळीकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि दिवसोंदिवस पैशांची वाढत चालेल्या मागणीला कंटाळून या अधिकाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत आरोपींचा शोध सुरु केला आहे. सर्व आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे या फसवणुकीमध्ये या व्यक्तीबरोबर शय्या करणारी रशियन महिलाही फरार असून पोलीस तिचाही शोध घेत आहेत.
देशभरात अशी प्रकरणं
हनी ट्रॅपची प्रकरण देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये दिवसोंदिवस वाढतच आहेत. फसवणूक करणारे एकट्या व्यक्तीला वेगवेगळी अमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांचे वादग्रस्त फोटो आणि व्हिडीओ लपूनछपून काढून त्यांना ब्लॅकमेल करतात. अशाप्रकारच्या फसवणुकींसंदर्भात यंत्रणाकंडून वेळोवेळी इशारा दिला जातो. मात्र क्षणिक मोहापायी अनेकजण वरचेवर अशा आमिषांना बळी पडून आर्थिक नुकसान करुन घेतात.