शेत-शिवार

मुसळधार,मराठवाड्यातील १५ लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका; ३ हजार ६७५ गावे बाधित


मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ३ हजार ६७५ गावांतील सुमारे १५ लाख ६१ हजार ७१ शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला.

यात सर्वाधिक ९५ टक्के जिरायत क्षेत्रफळ आहे. १२ लाख ४१ हजार ९६७ हेक्टरवरील पिके सध्या पाण्यात आहेत.

व्हिडिओ पहा 👇👇👇👇

https://x.com/beed_news/status/1831975322478387603?t=TwRsnYCcVqUXWUGR04mf9g&s=09

 

लहान-मोठी मिळून ६०९ जनावरे दगावली आहेत. तर १२ जणांचा मृत्यू वीज पडून, पुरात वाहून झाला आहे. १ हजार २२२ कच्च्या घरांची पडझड झाली आहे. तर ११५ पक्की घरे पावसामुळे बाधित झाली आहेत. १३२ जनावरांचे गोठे पावसामुळे वाहून गेले आहेत. मराठवाड्यात १ सप्टेंबरपासून झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे १ लाख हेक्टरवर नुकसान झाले. शेतीसह इतर नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया विभागीय महसूल व कृषी यंत्रणेने हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे राजकीय नेत्यांचे नुकसान पाहणीचे दौरे लागोलाग सुरू झाले आहेत.

 

जिल्हा……….. बाधित शेतकरी ………. शेतीचे नुकसान हेक्टरमध्ये
छत्रपती संभाजीनगर……६४६९१………..४५०७२
जालना……………..२५७४३५…………..२३२९७२
परभणी………………४२८२२३…………२८७८९२
हिंगोली………………२७६११८…………..२५८८९८
नांदेड…………..४४१३४४……………..३३४९८५
बीड……………..८४६१८………….७६१९४
लातूर…………..८६४२……………५९५३
धाराशिव ………….००००………..००००
एकूण……………१५६१०७१………….१२४१९६७

 

https://x.com/beed_news/status/1831975322478387603?t=wSyn_2z9bgMv9ODBfbYadg&s=09

 

एक शेतकऱ्याचं पोर जेव्हा सोशल मीडिया द्वारे जेव्हा आवाज उठवतं तेव्हा खासदार ,तहसीलदार थेट तुमच्या बांदावर व्यवस्था घेऊन दखल घेतात तेव्हा !
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवष्टीमुळे कापुसपिकाला मर रोग झाला आहे . स्वायबीन, मूग, उडीद, कांदा,भाजीपाला ईतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
खांडे पारगाव येथे बजरंग बप्पा गुडघाभर चिखलातून शेतात भेट. नुकसानीची पाहणी करतांना सोबत शेतकरी पुत्र धनंजय गुंदेकर , जिल्हा परीषद सदस्य गंगाभाऊ घुमरे, तहसीलदार साहेब, कृषीअधिकारी , मंडळ अधिकारी आणि मोठ्या संख्येने आमचे गावकरी उपस्थित होते.

 

अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने ३०७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button