12 वर्षांपासून दररोज फक्त 30 मिनिटे झोपतो, तरीही आहे एकदम फीट; असं करण्यामागे काय आहे कारण?
निरोगी आयुष्यासाठी किमान सहा तासांची झोप आवश्यक असते असं तज्ज्ञ सांगतात. सहा तासांपेक्षा कमी झोप झाल्यास विविध आजारांना निमंत्रण मिळते. याशिवाय चिडचिडपणा वाढतो आणि कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही.
असे असताना जपानचा एक व्यक्ती गेल्या १२ वर्षांपासून दररोज ३० मिनिटे झोप घेत असल्याचं समोर आलं आहे.
साऊथा चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टमध्ये यासंदर्भातील दावा करण्यात आला आहे. जपानचा नागरिक असलेला डाइसुके होरी हा ४० वर्षांचा आहे. त्याने दावा केलाय की दररोज ३० मिनिटांची झोप त्याच्यासाठी पुरशी आहे. इतकी कमी झोप घेऊन देखील तो दिवसभर ताजातवाणा राहतो. तो दररोज व्यायाम, जेवण, चालणे, फिरणे असे कामे उत्साहाने करत असतो.
होरीचा दावा आहे की इतक्या कमी झोपेमुळे त्यांचे आयुष्य वाढेल किंबहुना ते दुप्पट होईल. पश्चिमी जपानच्या ह्योगो प्रांतात राहणाऱ्या होरीने म्हटलंय की, त्याने शरीर आणि डोक्याला ३० मिनिटांच्या झोपेसाठी प्रशिक्षित केले आहे. या रुटिनमुळे त्याची कार्यक्षमता वाढली आहे. खेळणे किंवा जेवण्याच्या आधी एक तास आधी कॉफी तो पितो. यामुळे झोप न येण्यास मदत होते.
होरी हा व्यायसायिक आहे. त्यांचं म्हणणं आहे की दीर्घ झोपेपेक्षा चांगली झोप महत्त्वाची आहे. ज्यांना आपल्या कामावर कायम ध्यान केंद्रित करायचं आहे, त्यांना दीर्घ झोपेपेक्षा चांगल्या झोपेमुळे अधिक फायदा होतो. होरीने यावेळी डॉक्टर आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांचे उदाहरण दिले आहे. तो म्हणाला की, हे कर्मचारी कमी झोप घेतात पण तरी ते काम करताना पूर्ण ऊर्जा युक्त असतात.
होरी खरंच फक्त ३० मिनिटे झोपतो का?
होरीचा हा दावा खोटा वाटण्याची शक्यता जास्त आहे. त्याचमुळे सत्य जाणून घेण्यासाठी जपानच्या योमीउरी टीव्हीने ‘विल यू गो विद मी’ नावाच्या एका रियलिटी शोमध्ये याची सत्यता पडताळली. तीन दिवस होरीने निरीक्षण करण्यात आले. यात असं आढळून आलं की तो दिवसात फक्त २६ मिनिटे झोपत होता. तरी तो दिवसभर उत्साहित दिसत होता.
विशेष म्हणजे २०१६ मध्ये होरीने ‘जपान शॉर्ट स्लीपर्स ट्रेनिंग असोसिएशन’ सुरु केली आहे. तो या माध्यमातून लोकांना चांगल्या, अधिक गुणवत्तेच्या आणि तंदुरुस्ती संदर्भात क्लासेस देतो. जवळपास २१०० लोक त्याच्या या क्लासेसचा लाभ घेतात.