ब्रूस लीच्या मृत्यूचं कारण होतं पाणी? रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा… जाणून घ्या दररोज किती पाणी प्यावं
1940 ते 1973 दरम्यान लोकप्रिय झालेला मार्शल आर्टचा बादशहा ब्रूस लीचा (Bruce Lee) अचानक मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी ब्रूस लीने जगाला अलविदा केला. ब्रूस लीच्या संशयास्पद मृत्यूला पाणी (Water) कारणीभूत ठरल्याचं बोललं जात होतं.
2022 मध्ये एका संशोधनानुसार कमी वयात ब्रूस लीचा मृत्यू हायपोनेट्रेमियामुळे (Hyponatraemia) झाल्याचं सांगण्यात आलं. हा एक आजार आहे ज्यामध्ये मेंदूला सूज येते आणि याचं मुख्य कारण म्हणजे पाणी. याबाबतचा आणखी एक अहवाल नुकताच समोर आला आहे.
कॅनडातल्या मॅकगिल युनिव्हर्सिटी हेल्थ सेंटरमधल्या रिसर्च इन्स्टीट्यूटच्या एका टीमने केलेल्या संशोधनात जास्त पाणी प्यायल्याने हायपोनेट्रेमिया धोका वाढण्याची भीती असते. पाणी जास्त प्यायल्याने शरिरातील रक्तात मिठाची मात्रा कमी होते. यामुळे मेंदुला सूज येते यालाच हाइपोनैरेमिया म्हणतात. त्यामुळे ब्रूस लीच्या मृत्यूचं कारण पाणी हेच ठरल्याचं समोर आलं आहे.
कसा झाला ब्रूस लीचा मृत्यू?
ब्रूस ली हा मार्शल आर्टचा बादशाह मानला जात होता. त्याचबरो तो अभिनेता आणि दिग्दर्शकही होता. ब्रूस लीचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. 20 जुलै 1973 मध्ये वयाच्या अवघ्या 33 वर्षी ब्रूस लीचं निधन झालं. ब्रूस लीच्या मेंदूला सूज आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं होतं. यानंतर तब्बल 50 वर्षांनी ब्रूस लीचा मृत्यू जास्त पाणी प्यायल्याने झाल्याचं समोर आलंय.
संशोधन काय सांगतं?
या संशोधनातून असे समोर आले आहे की पाणी आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे आणि ते शरीराला हायड्रेट ठेवतं. पण काही वेळा निष्काळजीपणामुळे हेच पाणी मृत्यूचं कारणही बनू शकतं. जेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते तेव्हा त्याला डिहाइड्रेशन म्हणतात. त्याचप्रमाणे जेव्हा पाण्याचे प्रमाण वाढते तेव्हा त्याला ओव्हरहायड्रेशन म्हणतात. अहवालानुसार, जेव्हा आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त होतं, तेव्हा किडनी अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास अकार्यक्षण ठरते. जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होतं, ज्याला हायपोनेट्रेमिया म्हणतात. जेव्हा शरीरातील सोडियमची पातळी खूप कमी होते तेव्हा ही स्थिती उद्भवते. यामुळे डोकेदुखी, उलट्या, थकवा आणि मेंदूला सूज येऊ शकते.
शरीराला किती पाणी आवश्यक?
अशात प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे शरीराला नेमकं किती पाणी आवश्यक असतं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार माणसाची शारिरीक स्थिती जशी आहे, म्णजे उंची, वजन त्याची दैनंदिन कामं कशी आहेत यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवलं पाहिजे. दिवसात 8 ते 10 ग्लास पाणी पिणं हे आरोग्यदायी मानलं जातं. म्हणजे पाण्याचं इतकं प्रमाण शरीराला नुकसानकारक नाहीए. पाणी हेच जीवन आहे, माणसाच्या शरीराला पाण्याची आवश्यकता आहे. पण पाणी कमी किंवा जास्त पिऊ नका. शरीलाला जितकी आवश्यकता आहे त्याच प्रमाणात पाणी प्या, असा सल्ला तज्ज्ञ देतात.