विधानसभेला कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचे?छगन भुजबळांची उडवली खिल्ली ..
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भातही महत्त्वाची माहिती दिली.
पुढील काळात मतदारसंघनिहाय घोंगडी बैठका घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना दिली. त्याचबरोबर भाजपचे उमेदवार पाडणार, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीबद्दल मनोज जरांगे पाटील म्हणाले?
“आपल्या फक्त एकच उमेदवार द्यावा लागणार आहे. माझी फक्त एकच विनंती आहे. एकजूट आवश्य असलीच पाहिजे. शंभर टक्के प्रत्येकाने आशावादी असले पाहिजे आणि एकजूट असले पाहिजे. समाजाने एक दिला ना… आपली ती वाट आहे का, नाही. गोरगरिबांची लाट आली अठरापगड जातीची. एक उमेदवार द्या. दिला की, द्या एकदा निवडून त्याला. ७० वर्ष यांना दिले”, असे जरांगेंनी बैठकीत सांगितले.
मनोज जरांगेंनी कुणाला दिला इशारा?
“एक उमेदवार दिल्यानंतर मराठ्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला, तर त्याचा अर्थ असा समजायचा मराठ्यांनी हा समाजासाठी आणि आंदोलनासाठी आपल्यासोबत नव्हता, तर ही अवलाद स्वार्थासाठी होती. याला राजकारणात जायचे होते. याला आमदार व्हायचे होते”, असा इशारा जरांगेंनी अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत असलेल्यांना दिला.
“एक दिला, तर अडचण काय? तुमचे आणि त्याचे नसेल पटत. त्याच्या तोंडाकडे बघू नका, पण त्याला जातीसाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी द्या एकदा निवडून. नसेल पटत तरी द्या. त्यांच्याकडे तुम्ही जाऊ पण नका. तुमचे काम मला सांगा, मी त्याच्याकडून करून घेतो. तुम्ही काळजी करू नका”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
छगन भुजबळांची उडवली खिल्ली
“तिकडे (विधानसभेत) एकटा छगन भुजबळ येतोय. ओरडून ओरडून त्याच्या नाकावर चष्मा येतोय, तरी आरक्षणाला विरोधच करतोय. बोटाने वर सुद्धा लोटत नाही. त्याला कपडे लटकवायचा चिमटा बसून देऊ आपण. म्हणजे वरच राहील असा. ते नीट चालत पण नाही. देवेंद्र फडणवीसांनी माकडे जमा केली आणि मराठा समाजाच्या मागे लावली”, अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली.
देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र
“हे लय बेक्कार लोक आहेत. माझ्याजवळ काही नाही म्हणून धोरणाला लागलेय, नाहीत यांनी मला आतापर्यंत आत (तुरुंगात) टाकले असते. माझ्याजवळ तपासाला काय आहे? 13 पत्रे आहेत माझ्या घरावर सिमेंटचे. ते नेऊच शकत नाही. देवेंद्र फडणवीस नेईल म्हटल्यावर मी आता त्याला चौहीकडून भिंती बांधल्या आहेत”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.